Latest

David Warner : मी सगळ्यांना फलंदाजी शिकवू शकत नाही! वॉर्नरने फलंदाजांना फटकारले

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने सलग पाच पराभवानंतर पहिल्या विजयाची नोंद केली. गुरुवारी (दि. 20) दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर 4 गडी राखून पराभव केला. दिल्लीच्या विजयात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 41 चेंडूत 57 धावा फटकावून महत्त्वाचे योगदान दिले. मात्र, सामन्यानंतर वॉर्नरने आपल्याच संघाच्या फलंदाजांवर निशाणा साधून त्यांच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दिल्ली संघात समाविष्ट असलेल्या फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केलेली आहे. पृथ्वी शॉ (सहा सामन्यात 47), सरफराज खान (दोन सामन्यात 34), यश धुल (दोन सामन्यात तीन), अमन खान (चार सामन्यात 30) आणि अभिषेक पोरेल (चार सामन्यात 33) यांपैकी कोणीही आतापर्यंत मोठी खेळी साकारू शकलेला नाही. तर 6.50 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेल्या मिचेल मार्शने 4 सामन्यात केवळ 6 धावा काढून निराशाजनक प्रदर्शन केले आहे. त्यातच दिल्लीच्या पहिल्या विजयावर संघाचा कर्णधार वॉर्नरची प्रतिक्रिया समोर आली आहे. आपल्या फलंदाजांच्या कामगिरीवर तो नाराज दिसत आहे.

वॉर्नरला (David Warner) विचारण्यात आले की तो या विषयावर भारताच्या युवा फलंदाजांशी बोलला का? तेव्हा तो म्हणाला, 'प्रामाणिकपणे सांगायचे तर, आम्ही या विषयावर जास्त चर्चा करत नाही कारण तुम्हाला तुमच्या कौशल्यांवर विश्वास असणे आवश्यक आहे. मला हेच माझ्या सहका-यांना सांगायचे आहे. खेळाडूंना फलंदाजी कशी करायची हे मी शिकवू शकत नाही. यासाठी तुम्हाला तुमचा मार्ग शोधावा लागेल. फलंदाजांनी स्वत: कष्ट घेणे गरजेचे आहे. 150 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकणा-या गोलंदाजांचा सामना करणार असाल तर तुम्ही धावा काढण्याचे तंत्र आणि पद्धत स्वत:हून विकसीत करणे आवश्यक आहे,' असे महत्त्वाचे सल्ले त्याने दिले.

नेट प्रॅक्टीसदरम्यान शॉर्ट बॉलचा सराव करणे फलंदाजांसाठी चांगले असू शकत नाही, असे वॉर्नरचे (David Warner) मत आहे. तो म्हणाला, 'नेटमध्ये सराव करणे खूप कठीण आहे. ऑस्ट्रेलियातही आम्ही शॉर्ट पिच चेंडूंचा सराव करत नाही. मला वाटतं, जर तुम्ही खेळामध्ये सर्व वेळ शॉर्ट बॉलचा सराव केला तर तुम्ही लिमिटेड रहाल. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की या फॉरमॅटमध्ये गोलंदाज फक्त एक शॉर्ट चेंडू टाकतील आणि ही फलंदाजांसाठी चांगली गोष्ट आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT