राष्ट्रपती निवडणूक : पुढारी ऑनलाइन डेस्क : मी काँग्रेसचा एमएलए आहे पण तरीही मी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मत दिले आहे, असे ओडिसाचे आमदार मोहम्मद मोकिम यांनी मतदानानंतर सांगितले.
याबाबत एएनआयने ट्विट केले आहे. मोहम्मद यांनी म्हटले आहे की, मी काँग्रेसचा आमदार असलो तरी देखील मी भाजप प्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मत दिले आहे. हा माझा वैयक्तिक निर्णय होता. मी माझ्या हृदयाचे ऐकले. ज्याने मला मातीसाठी काहीतरी करण्याचे मार्गदर्शन केले, असे ओडिसाचे आमदार मोहम्मद मोकिम यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: