परतूर, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील साठेनगरात घरासमोर ठेवलेली चाळणी बाजूला घ्या, असे सांगितल्याने एका महिलेने पती-पत्नीला फरशीने मारून जखमी केले. या प्रकरणी संबंधित महिलेविरोधात परतूर (जालना) पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साठेनगरमध्ये प्रकाश मोरे राहतात. त्याच्या शेजारी राहणार्या महिलेने चाळणी घरासमोर लावली होती. प्रकाश मोरे यांनी "तुमची चाळणी बाजूला घ्या", असे सांगितले. संबंधित महिलेने त्यांना शिवीगाळ करण्यात सुरुवात केली.
प्रकाश मोरे आणि त्यांची पत्नी यांनी शिव्या का देतात, अशी विचारणा केली. यावेळी महिलेने माेरे दाम्पत्याला फरशीने मारहाण केली. प्रकाश मोरे यांच्या उजव्या हाताला आणि डोक्याला मार लागून जखमी झाले आहे. त्यांच्या पत्नीला मुक्कामार लागला. या प्रकरणी प्रकाश मोरे यांच्या फिर्यादीवरून संबंधित महिलेविरोधात परतूर (जालना) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलत का ?