Latest

Hrithik Roshan : ऋतिकने फिटनेसबाबत या अभिनेत्यालाही दिली मात, तब्बल १२ किलो घटवलं वजन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्कर- गायत्री निर्देशित आणि बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन ( Hrithik Roshan ) आणि सैफ अली खान यांचा आगामी 'विक्रम वेधा' चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. या चित्रपटात मराठी अभिनेत्री राधिका आपटेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हृतिक जवळपास ३ वर्षानंतर या चित्रपटातून वापसी करत आहे. परंतु, हृतिकने यासाठी जवळपास एक- दोन नव्हे तर, १२ किलो वजन घटवलं आहे.

आगामी 'विक्रम वेधा' या चित्रपटातील हृतिक रोशनचे ( Hrithik Roshan ) २ लूक समोर आले आहेत. यातील तरूण वयातील वेधाची लूक साकारण्यासाठी हृतिकने जवळपास १० ते १२ किलो वजन कमी केले आहे. या चित्रपटाच्या ९९ दिवसाच्या शूटिंगमध्ये धमाकेदार अॅक्शन सीन, उत्तम डॉयलॉग आणि उत्कृष्ट अभिनय दाखविले आहेत. हृतिकने नुकतेच अबुधाबीमध्ये चित्रपटाचे ३० दिवस शूटींग संपवले आहे. तर या चित्रपटात 'विक्रम'ची मुख्य भूमिका बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने साकारली आहे.

सैफच्या पत्नीच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री राधिका आपटे दिसणार आहे. या चित्रपटात विक्रमची पत्नी राधिका वेदाचा कोर्टातील खटला लढताना दाखविले आहे. या चित्रपटाचे शूटिंग अबुधाबीसोबत लखनौ आणि मुंबईत पार पडले आहे. सध्या 'विक्रम वेधा' हा चित्रपट प्रदर्शनास सज्ज आहे. या चित्रपटातून हृतिक रोशनचे तीन वर्षानंतर वापसी करणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती एस. शशिकांत आणि भूषण कुमार यांनी केली आहे. सैफ, हृतिक आणि राधिकासोबत चित्रपटात रोहित सराफ, योगिता बिहानी, शारिब हाशमी आणि सत्यदीप मिश्रा याच्याही अहम भूमिका आहेत. आगामी 'विक्रम वेधा' ३० सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT