Latest

WhatsApp Payment : व्हॉटस्अ‍ॅप पेमेंट न झाल्यास रिफंड कसा मिळेल?

Arun Patil

भारतात युनिफाईड पेमेंटस् इंटरफेस म्हणजेच 'यूपीआय' पेमेंटस्चे प्रमाण प्रचंड वाढले असून आपल्यापैकी बरेच जण किराणा खरेदी करण्यासाठी, वीज बिल भरण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी एवढेच नाही, तर भाडे भरण्यासाठी यूपीआयचा वापर करतात; मात्र काहीवेळा WhatsApp UPIकिंवा अन्य थर्ड पार्टी यूपीआयमार्फत होणारे व्यवहार अडकण्याची शक्यता असते.

आपल्या खात्यातून पैसे कट झाल्यानंतर समोरील व्यक्तीस पैसे मिळाले नसल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल.

'एक्स' या सोशल मीडियावर एसबीआयच्या ग्राहकाने एक पोस्ट केली असून त्यात म्हटले की, आपण 3500 रुपये व्हॉटस्अ‍ॅप यूपीआयमार्फत स्थानांतरित केले. ती रक्कम माझ्या खात्यातून वळती झाली; मात्र मित्राच्या खात्यावर अद्याप जमा झाली नाही. हे पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल किंवा कोणत्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल, अशी विचारणा केली. यावर एसबीआयने म्हटले, आपली तक्रार वर नोंदवा. त्यानंतर ऊळसळींरश्र झरूाशपीं चा पर्याय निवडा. तेथे विवरण भरा, असे उत्तर दिले. संबंधितांची तक्रार दाखल झाल्यानंतर एसबीआयची टीम या प्रकरणात लक्ष घालते. ग्राहकाकडून तक्रारीची नोंद झाल्यानंतर संबंधिताला तक्रार क्रमांक प्राप्त होतो. हा क्रमांक मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर येतो. ही तक्रार टॅट म्हणजेच 'टर्न अराऊंड टाईम'कडून हाताळली जाते. बहुतांश अपयशी ठरलेल्या व्यवहाराचे रिफंड हे त्याच्या खात्यात जमा होते. काही वेळा वेळही लागू शकतो. एका तासात रिफंड जमा झाला नाही, तर बँकेच्या कस्टमर सपोर्टला कॉल करणे गरजेचे आहे.

व्हॉटस्अ‍ॅपवरून पैसे कसे पाठवावे?

एकदा आपले खाते व्हॉटस्अ‍ॅपला लिंक झाले की, पैसे पाठवू शकतो आणि मिळवूदेखील शकतो. यासाठी व्हॉटस्अ‍ॅपला बँक खाते जोडणे गरजेचे आहे. यासाठी व्हॉटस्अ‍ॅपचा नंबर आणि बँक खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक एकच असणे आवश्यक आहे. त्यानुसार यूपीआय सुविधेचा लाभ घेत काही क्षणांत पैसे ट्रान्स्फर करू शकता.

पहिली पायरी : एकदा व्हॉटस्अ‍ॅपला खाते लिंक झाल्यानंतर ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीची निवड करा. त्यानंतर पेमेंट ऑप्शनचा पर्याय निवडल्यानंतर चॅट विंडो सुरू करा. संबंधित व्यक्तीचा यूपीआय आयडीचा वापर करून पैसे ट्रान्स्फर करू शकतो. जसे की आपण गूगल पे किंवा फोन पे, भीम अ‍ॅपला करतो.

दुसरी पायरी : त्यानंतर रक्कम टाका आणि यूपीआय पीन आयडी द्या. अचूक यूपीआय पीन दिल्यानंतर आपल्या खात्यातून ती रक्कम समोरील व्यक्तीच्या बँक खात्यात जमा होते. 10 ऑक्टोबर 2023 रोजी एनपीसीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले, सेवा किंवा साहत्यिक खरेदीसंदर्भातील व्यवहार पूर्ण न झाल्यास व समोरील व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा झाले नसेल किंवा चुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली असेल किंवा चुकीच्या व्यक्तीकडे पैसे गेले असतील, तर ग्राहकांनी तत्काळ बँकेत जावे आणि तक्रार नोंदवावी. ग्राहक हा आपल्या बँकेच्या माध्यमातून अवास्तव शुल्क, प्री आर्बिट्रेशन, कमिशन यासंदर्भातील दाद मागू शकतो. यूपीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पैसे ट्रान्स्फर करणार्‍या बँकेने उपस्थित केलेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी पैसे स्वीकारणार्‍या किंवा न स्वीकारणार्‍या बँकेने पुरावे सादर करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT