न्यूयॉर्क : आपल्या आकाशमालेचा प्रमुख सूर्य आहे. त्याचे निश्चितपणे वय किती आहे? हा प्रश्न सर्वांची जिज्ञासा वाढविणारा आहे. आजपर्यंत शास्त्रज्ञांनी अनेक संशोधनातून पृथ्वीबरोबरच अन्य ग्रह आणि सूर्याचे नेमके वय किती आहे? याचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच सूर्यापूर्वीच पृथ्वीचे अस्तित्व नष्ट होईल का? अथवा पृथ्वीपूर्वीच सूर्याचे अस्तित्व नष्ट झाले तर पृथ्वीचे काय होईल, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
पृथ्वीवर आतापर्यंत घडलेल्या अनेक प्राकृतिक घटनांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी पृथ्वीबरोबरच, सूर्यमाला आणि सूर्याच्या निर्मिती प्रक्रियेबरोबरच सूर्याचे वयसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासंबंधीच्या अनेक संशोधनातून सूर्य सध्या सुमारे 4.47 अब्ज वर्षे वयाचा असल्याचे म्हटले जाते. तर काही संशोधनात सूर्याचे वय सध्या 4.6 ते 5 अब्ज वर्षे इतके असल्याचे म्हटले जाते.
खगोलिय द़ृष्टिकोनातून विचार केल्यास सूर्य हा एक तारा आहे. ज्याच्या तंत्राला 'सूर्यमाला' असे म्हटले जाते. सूर्याच्या कोअरमध्ये हायड्रोजचे हिलियममध्ये परिवर्तन होत असते. यामुळे तेथून बाहेर पडणारी ऊर्जा ही प्रकाश तसेच विकिरणांच्या माध्यमातून सर्वबाजूंना फैलावत असतेे. तापमानांच्या आधारे तार्यांचे वर्गीकरण केले जाते. याप्रमाणे निळे ते लाल तारे असे ओ, बी, ए, जी, के आणि एम अशी तार्यांची वर्गवारी केली जाते. सूर्य हा सध्या पांढर्या रंगात दिसतो. हायड्रोजनला हिलियममध्ये बदलण्यास
10 अब्ज वर्षे लागतात. त्यानंतर तो निळा होतो. यामुळे सध्या सूर्य मध्यवयीन असल्याचे स्पष्ट होते. यामुळे त्याचे वय 4.5 ते 4.6 अब्ज वर्षे असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.