hot cities in world 
Latest

Hot cities in World : ही आहेत जगातील सर्वाधिक उष्ण शहरे, किमान तापमान वाचून व्हाल हैराण

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Hot cities in World : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. हवामान बदलांमुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अलीकडे कमाल तापमानाचे नवनवीन रेकॉर्ड तयार होत आहे. मात्र, जगात काही शहरे अशी आहे, जी कायमच उष्ण असतात. इथे सामान्य तापमान 40 ते 50 डिग्री सेल्सिअसच्या घरात असते. तर उन्हाळ्यात ही शहरे पूर्ण आग ओकतात. इतके की अनेकदा उन्हाळ्यात ही शहरे निर्मनुष्य होतात.

Hot cities in World : बंदर ए महशाहर

ईराणमधील बंदर ए महशाहर या शहराचे आतापर्यंत सर्वात जास्त तापमान नोंदवले गेले आहे. जुलाई 2015 मध्ये इथे 74 डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे. हे जगातील आतापर्यंतचे सर्वाधिक नोंदवलेले गेलेले तापमान आहे. तर त्यापूर्वी याचे अधिकतर तापमान 51 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले होते.

Hot cities in World : दश्त ए लूट

बंदर ए महशाहर शहरानंतर इराणमधीलच दश्त ए लूट या शहराचा सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून क्रमांक येतो. वर्ष 2003 ते 2009 च्या मध्ये इथे 70.7 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद केली गेली होती. सध्या हा संपूर्ण इलाखा पूर्णपणे निर्मनुष्य आहे. इथे कोणीही राहत नाही.

Hot cities in World : डेथ वैली

कॅलिफोर्निया येथील डेथ व्हॅलीची गनती जगातील सर्वाधिक उष्ण स्थानांमध्ये होते. येथील किमान तापमान 47 अंश सेल्सिअस असते. 1913 मध्ये येथील सर्वाधिक 56.7 डिग्री सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. डेथ व्हॅली ही अमेरिकेतील सगळ्या जास्त शुष्क स्थानांपैकी एक आहे.

घडामेस आणि केबिली

युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट केलेल्या लीबियाच्या वाळवंटात वसलेले घडामेस शहर सर्वाधिक उष्ण शहराच्या यादीत मोडते. इथे सामान्य तापमान 40 डिग्री सेल्सिअस असते. येथील अधिकतर तापमान 55 डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले आहे. घडामेस सारखेच तापमान ट्यूनिशिआच्या वाळवंटात वसलेल्या केबिली शहराचे असते. येथेही सामान्य तापमान 40 डिग्री असते. तर आतापर्यंतचे अधिकतर तापमान 55 डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

Hot cities in World : किबूजट शहर

इजरायमधील किबूजट शहरात जून 1942 मध्ये 54 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. या शहराचे तापमान उन्हाळा नसतानाही 37 डिग्री सेल्सिअसच्या घरात असते.

Hot cities in World : वाडी हाल्फा शहर

सूदानच्या वाडी हाल्फा या शहरात जून महिन्यात सर्वाधिक उकाडा पडतो. येथील किमान तापमान नेहमीच 41 डिग्री सेल्सिअसच्या घरात असते. इथे एप्रिल 1967 मध्ये 53 डिग्री सेल्सिअस नोंदवून सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंद केली आहे. सूदानच्या या शहरात पाऊस पडत नाही.

Hot cities in World : टिम्बकटू शहर

सहाराच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले माली देशातील टिम्बकटू शहरात थंडीच्या दिवसातही उकाडा असतो. इथे जानेवारी महिन्यात देखील 30 डिग्री सेल्सिअस तापमान असते. येथे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान 49 डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT