आजचे राशिभविष्य  
Latest

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार २०, २०२३

मोहन कारंडे


मेष : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्‍हाला मनःशांती लाभेल. एखादे महत्त्वाचे काम वेळेत पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्राशी संबंधित कोणतीही चांगली बातमी मिळू शकते. जास्त काम असूनही घर-कुटुंबाला प्राधान्य दिल्यास घरातील वातावरण आनंदी राहील.

वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक आहे. तुम्ही तुमच्या प्रतिभा आणि उर्जेने प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ शकाल, असे श्रीगणेश म्‍हणतात. तुमच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करा. मालमत्तेच्या विभाजनावरील वाद परस्पर संमतीने सोडवले जातील. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळू शकते. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो.

मिथुन : आज गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चिंतेतून सुटका होईल, असे श्रीगणेश सांगतात. लाभाच्या प्राप्तीमुळे उत्साह वाटेल. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा समन्वय साधण्‍याची कसरत करावी लागेल. व्‍यवसायात एखादा मोठा व्‍यवहार होण्‍याची शक्‍यता आहे. कुटुंबात सुसंवाद राखेल.

कर्क : आज घरामध्ये शुभ कार्यक्रमाचे नियोजन असेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेली चिंता दूर होईल, असे श्रीगणेश म्‍हणतात. लोक तुमच्या बौद्धिक क्षमतेची प्रशंसा करतील. मानसिक शांतता लाभेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहिल. कठोर परिश्रमामुळे आरोग्यावर परिणाम करू शकतात.

सिंह : भविष्यातील योजनांबाबत आज काही महत्त्वाचे काम करावे लागेल, असे श्रीगणेश सांगतात. कामात व्यस्त असण्यासोबतच तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवाल. कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहू नका. घरातील समस्या पती-पत्नी एकत्र सोडवू शकतील. वाईट सवयी आणि संगतीपासून दूर राहा.

कन्या : आज तुम्ही केलेले महत्त्वाचे काम प्रशंसनीय ठरेल. सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढेल, असे श्रीगणेश सांगतात. दिवसातील काही वेळ मनोरंजनातही जाईल. नातेवाईकांकडून सहकार्याची अपेक्षा करू नका, केवळ स्वतःच्या कार्यक्षमतेवर अवलंबून राहून तुम्ही यशस्वी होऊ शकता. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

तूळ : आज तुमच्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहील, असे श्रीगणेश सांगतात. घराची साफसफाई आणि इतर कामांमध्येही व्‍यस्‍त रहाल. जवळच्या व्यक्तीशी संबंधित एखादी अप्रिय घटना घडू शकते. व्यवसायात घेतलेल्या निर्णयांमध्ये अडचणी येण्‍याची शक्‍यता. पती-पत्नीमध्ये गैरसमज होऊ शकतात.

वृश्चिक : आज घरी पाहुण्‍यांची वर्दळ असल्‍याने कौटुंबिक वातावरण आनंदी राहील , असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या स्वभावात सकारात्मकता राहील. मालमत्तेचा वाद मध्यस्थीने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात आज तुम्ही तुमच्या उर्जेने आणि साहसाने अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.

धनु : आज ग्रहांची स्थिती तुमच्या अनुकूल असल्याचे श्रीगणेश म्‍हणतात. कामे वेळेवर पूर्ण करू शकता. तुमच्या समजूतदारपणाने संकटातून बाहेर पडाल. घरातील मोठ्या व्यक्तींचे आरोग्य बिघडू शकते. नेटवर्किंग आणि सेल्समध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

मकर : आज कामे प्रभावीपणे पार पाडण्यास सक्षम असाल. तुमची संवेदनशीलता घर-कुटुंब व्यवस्था व्यवस्थित ठेवेल. विद्यार्थी देखील अभ्यासात पूढे निघून जातील. सामाजिक आणि राजकीय कार्यांपासून दूर राहा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. तणावाचा सामना करावा लागण्‍याची शक्‍यता.

कुंभ : आज अधिक परिश्रम करावे लागतील, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या व्यवहार कौशल्याने तुम्ही सर्व कामे व्यवस्थित सोडवू शकाल. मित्र किंवा नातेवाईकाबद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतात. विद्यार्थी आणि युवकांना ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. वैवाहिक जीवनात गोडवा राहील, जुना आजार पुन्हा होण्‍याची शक्‍यता.

मीन : श्रीगणेश सांगतात की, आजचा काळ उत्तम आहे. नातेवाईक किंवा मित्राकडून विशेष सहकार्य मिळेल. एखाद्या विषयावर निर्णय घेण्यापूर्वी अधिक विचार करण्याची गरज आहे. व्यवसायात, विशेषत: भागीदारी उपक्रमांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. कुटुंबातील प्रश्‍नांमध्‍ये बाहेरील व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT