मेष : श्रीगणेश सांगतात, आज सामाजिक कार्यात स्वप्रतिभेने चमकाल. स्थलांतराशी संबंधी योग बनत आहे. तरुण करिअरचा गांभीर्याने चिचार करतील. आळसामुळे काही महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाशीही वादात पडू नका. भागीदारी संबंधित कामात लाभदायक परिस्थिती राहील. जोडीदाराबरोर वाद टाळा. ॲलर्जीचा त्रास होण्याची शक्यता.
वृषभ : आज तुम्ही कौटुंबिक आणि व्यावसायिक कामांमध्ये संतुलन राखाल. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे, असे श्रीगणेश म्हणतात. तुम्ही तुमच्या कामाप्रती समर्पित असाल. प्रॉपर्टी संबंधित कामे आज टाळा. कोणालाही कर्ज देताना विचार करा. भागीदारी व्यवसायातील दीर्घकाळ सुरु असणारा तणाव कमी होतील. जोडीदाराच्या सहकार्यामुळे चिंता कमी होईल. जुन्या शारीरिक समस्यांपासून आराम मिळेल.
मिथुन : आज तुम्ही कुटुंबासाठी वेळ द्याल. मुलांसोबत थोडा वेळ घालवून त्यांना मार्गदर्शन केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढेल, असे श्रीगणेश सांगतात. विद्यार्थ्यांना यश मिळेल. जवळच्या नातेवाईकाशी मतभेद होऊ शकतात. व्यवसायात कोणत्याही नवीन कामाच्या योजनेवर गांभीर्याने काम करा. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य उत्तम राहील.
कर्क : आज अशक्य वाटत असणारे काम शक्य होईल. मागील काही दिवस असणारी अस्वस्थताही दूर होण्याची शक्यता, असे श्रीगणेश म्हणतात. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. इतरांवर अवलंबून राहिल्यास नुकसान होण्याची शक्यता. रागामुळे नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात जोखीम घेणे टाळा. पती-पत्नी एकमेकांच्या भावनांचा आदर करतील. रक्तदाब आणि मधूमेहग्रस्तांनी त्यांच्या कामाची शैली, दिनचर्या आणि आहाराबद्दल विशेष जागरूक राहावे.
सिंह : श्रीगणेश सांगतात, आज तुमच्यासाठी काळ अनुकूल आहे. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. एखादी संधी मिळण्याची शक्यता. धार्मिक कार्यातही रुची वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित व्यवहारात सावधगिरी बाळगा. व्यवसायात आज कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ शकतो. सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता.
कन्या : आजच्या दिवशी एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट लाभदायक ठरेल, असे श्रीगणेश म्हणतात. दीर्घकाळापासून सुरु असलेल्या समस्येवर मार्ग सापडेल. तुमच्या विचारांसह दैनंदिन दिनचर्येत बदल करण्याच्या प्रयत्नाला यश मिळेल. निकटवर्तीच समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. मनाप्रमाणे यश मिळेल. व्यवसायात कर्मचारी आणि सहकारी यांच्याशी योग्य समन्वय राखला जाईल. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता राहू शकते.
तूळ : प्रभावशाली लोकांशी संपर्क आल्याने तुमच्या विचारातही सकारात्मक बदल होईल, असे श्रीगणेश सांगतात. रखडलेले काम पूर्ण केल्याने चिंता दूर होईल. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेत योग्य निकाल मिळेल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक स्तरावर काळजीपूर्वक विचार करा. नकारात्मक क्रियाकलाप असलेल्या लोकांपासून दूर रहा. कोणावरही जास्त अवलंबून राहणे हानिकारक ठरू शकते. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल, उत्तम आरोग्य राखले जाईल.
वृश्चिक : आज तुम्ही नातेवाईक आणि मित्रांच्या संपर्कात राहाल. यामुळे नात्यात गोडवा येईल, असे श्रीगणेश सांगतात. एखाद्या मुत्सद्दी व्यक्तीची मुलाखतही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कोणतीही चिंता दूर होईल. आर्थिक व्यवहारांवरुन होणारे वाद टाळा. घरात पाहुण्यांच्या आगमनाने अनेक महत्त्वाची कामे थांबू शकतात. प्रतिकूलतेवरही मात करू शकाल. व्यवसायाला अपेक्षित परिणाम मिळण्याची आशा आहे. घरात आनंदी वातावरण राखण्यात तुमचे योगदान असेल.
धनु : अध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात तुमची आवड वाढेल आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल घडतील, असे श्रीगणेश म्हणतात. तुमचे सर्व काम विचारपूर्वक करा. अविवाहितांना विवाहाबाबत योग्य प्रस्ताव येऊ शकतो. इतर लोकांच्या कामात जास्त हस्तक्षेप करू नका; अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. कोणत्याही अनुचित कामात रस घेऊ नका. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असू शकतो. पती-पत्नीमध्ये गैरसमजामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.
मकर : श्रीगणेश सांगतात की, आज तुमचे व्यक्तिमत्वही सुधारेल. प्रतिष्ठित लोकांसोबतची भेट फायद्याची ठरेल. एखादे रखडलेले कामही पूर्ण होऊ शकते. नकारात्मक वृत्तींच्या लोकांपासून लांब रहा. एखाद्या प्रकल्पातील अपयशामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आज तुम्हाला व्यवसायात नवीन ऑर्डर आणि करार मिळू शकतात. तुमच्या कामामुळे तुमच्या जोडीदाराचे कुटुंबाला पूर्ण सहकार्य असेल.
कुंभ : आज अडकलेल्या मालमत्तेच्या बाबतचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या बातम्याही कळतील, असे श्रीगणेश सांगतात. अचानक प्रिय मित्र भेटल्याने मन प्रसन्न होईल. वाहनाशी संबंधित खरेदीचाही चांगला योग आहे. कोणाशीही संवाद साधताना योग्य शब्द वापरा. रागाने दुसऱ्याला त्रास होऊ शकतो. नात्यातही दुरावा येईल. वरिष्ठांचे सहकार्य तुम्हाला तुमच्या प्रयत्नात यश मिळवून देऊ शकते. वैवाहिक जीवनात योग्य सामंजस्य राखले जाईल. हवामान बदलामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवेल.
मीन : घरात विशेष पाहुण्यांच्या आगमनाने दिवस व्यस्त राहू शकतो, असे श्रीगणेश सांगतात. भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मुलांच्या किलबिलाटाबद्दल कोणतीही शुभ सूचना मिळाल्याने उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. खर्च जास्त होईल. त्यामुळे अनावश्यक गोष्टींवर नियंत्रण ठेवा. इतर लोकांच्या व्यवहारात हस्तक्षेप केल्याने तुमची अपमानास्पद परिस्थिती उद्भवू शकते. तुम्ही तुमच्या कामातून काम करत राहा. आज तुम्ही व्यावसायिक कामांवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. आरोग्य उत्तम राहू शकते.