आजचे राशिभविष्य  
Latest

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? सोमवार १६, ऑक्‍टोबर २०२३

निलेश पोतदार

– ज्यो. मंगेश महाडिक

मेष ः चपळ कृतीमुळे उत्तेजन मिळेल. यश मिळविण्यासाठी वेळ, काळ पाहून संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा द़ृष्टिकोन विस्तारेल.

वृषभ ः तुमच्या उपस्थितीमुळे प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनेल. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात.

मिथुन ः बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. मनोबल उंचावेल.

कर्क ः मोकळेपणा आणि प्रेमाच्या अनुभूतीचा शोध घ्या. प्रेमीयुगुलांनी आपल्या कुटुंबाच्या भावनांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे.

सिंह ः पालकांच्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. मनावर असलेले ओझे हलके करण्यासाठी नातेवाईक पुढाकार घेतील.

कन्या ः बँकिंग क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली बातमी मिळेल. काहीजणांना बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. दिवस आनंदात जाईल.

तूळ ः प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव— दु:ख देईल. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. कोणताही निर्णय विचार करून घ्या.

वृश्चिक ः महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसर्‍याच्या दडपणाखाली वावरू नका. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल.

धनु ः अर्थपुरवठा होत राहील. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंदवार्ता मिळेल.

मकर ः तुम्ही केलेल्या शारीरिक बदलामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व निश्चितपणे खुलून दिसेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल.

कुंभ ः जीवनातील चढ-उतारांमुळे फायदा होईल. नातेवाईक अथवा मित्रमंडळी अचानक तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील.

मीन ः एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT