आजचे राशिभविष्य  
Latest

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | साेमवार ६ नोव्हेंबर २०२३

निलेश पोतदार

– ज्यो. मंगेश महाडिक

मेष ः प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. मित्रांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल.

वृषभ ः तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

मिथुन ः पुरेपूर प्रयत्न करा. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. मनावर ताबा ठेवावा लागेल.

कर्क ः गेलेले पैसे परत मिळू शकतात. आजचा दिवस चांगला आहे. कारण, तुमच्या कामाकडे लक्ष जाईल.मनोबल उंचावेल, आर्थिक आवक चांगली.

सिंह ः संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. धैर्य दाखवाल. मन प्रसन्न राहील.

कन्या ः मुलांकडे लक्ष देण्याची गरज असेल, सहयोगी बनून परिस्थिती हाताळा. आनंदासाठी नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. सकारात्मक विचार करा.

तूळ ः अनुरुपांसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. त्यामुळे काही जणांच्या मनावरील ताण कमी होईल. आत्मविश्वास वाढेल आणि मनोबल उंचावेल.

वृश्चिक ः बेरोजगारांना आज नोकरी मिळण्याची शक्यता असू शकते. तुम्हाला आपले प्रयत्न वाढवण्याची आवश्यकता आहे. कोणताही निर्णय विचार करून घ्या.

धनु ः शारीरिक तसेच मानसिकद़ृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल, थोडा आराम करा आणि सात्विक अन्नसेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल.

मकर ः जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहील, विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम उमटतील. बोलताना विचार करून बोला.

मीन ः दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. प्रवास आरामदायी नसेल, नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. आर्थिक आवक चांगली राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT