आजचे राशिभविष्य 
Latest

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? शुक्रवार, १२ जानेवारी २०२४

सोनाली जाधव

राशिभविष्य – ज्यो, मंगेश महाडिक 

मेष : अनावश्यक तणावआणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा. अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल.

वृषभ : आशावादी राहाआणि उजळ बाजूकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आशा-आकांक्षा प्रत्यक्षात येतील.

मिथून : आरोग्य चांगले राहील. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उंची देऊ शकता.

कर्क : वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल.

सिंह : कार्यालयात तसेच घरी तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल. महत्त्वाच्या व्यक्ती मदत द्यायला तयार असतील.

कन्या : आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव दडपण बाजूला सारा. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर त्यातून धनप्राप्ती होईल.

तूळ : मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. पैशासंबंधी जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो.

वृश्चिक : तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु उत्साह नियंत्रणात ठेवा. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा.

धनु : पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल,

मकर : दिवस उत्तेजनापूर्ण असेल. तुमच्या कामाची आज स्तुती होईल. आज जीवनाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकता.

कुंभ : निष्काळजीपणा आर्थिक नुकसान देऊ शकतो. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस.

मीन : विवादात्मक विषय काढणे टाळा. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT