Latest

नाक चोंदल्यावर घरगुती उपाय

Arun Patil

काही समस्या वरकरणी किरकोळ जरी वाटत असल्या तरी त्यांचा त्रास बराच होत असतो. त्यामध्येच नाक चोंदण्याच्या समस्येचा समावेश आहे. वातावरणातील बदलामुळे अनेकदा नाक चोंदण्याच्या व त्यामुळे गुदमरण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. नाक बंद होणे म्हणजे नाकपुड्या बंद पडल्यामुळे श्वास घेण्यास किंवा बोलण्यास त्रास होतो. अनेक लोक चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी जबरदस्तीने श्वास घेण्याचा प्रयत्न करतात. परिणामी, छातीत अनेकदा तणाव जाणवतो. त्यामुळे डोकं जड होणे, छातीत दुखणे आदी समस्या उद्भवतात. चोंदलेले नाक कसे मोकळे करायचे, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. त्यावर तज्ज्ञांनी सुचवलेले हे काही घरगुती उपाय…

लसूण : लसूण जेवणाची चव तर वाढवतोच; पण सोबत त्याच्या अँटिबॅक्टेरियल आणि अँटिव्हायरल गुणधर्मांसाठी ओळखला जातो. लसणात सल्फर देखील असते जे फुफ्फुसांना निरोगी ठेवते. थंडीमुळे नाक बंद होत असेल तर लसणाचा वास घ्या.

पुदिना : पुदिन्यात मेन्थॉल असते जे एक नैसर्गिक डिकंजेस्टेंट आहे. हे तुमच्या नाकातील अवरोधित वायुमार्ग उघडण्यास मदत करतात. पुदिन्याच्या तेलाचा सुगंध देखील नाकातील रक्तसंचयापासून आराम देऊ शकतो.

आले : थंडीच्या दिवसात आल्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. आल्यामध्ये जिंजरॉल संयुगे असतात ज्यामुळे नाकाची जळजळ कमी होते आणि त्याचा तीव्र वास तुमचे 'ब्लॉक' केलेले नाक मोकळे करू शकतो. हिवाळ्यात नाक बंद झाल्यामुळे होणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी आल्याचा गरम चहा पिण्याची शिफारस केली जाते.

ओवा : ओवा केवळ तुमचे जेवण चवदार बनवत नाही तर नाकातील रक्तसंचय कमी करण्यासाठी देखील चांगला मानला जातो. काही दिवस ओव्याचा चहा पिऊन किंवा ओवा खाऊन आराम मिळू शकतो.

लिंबू रस-मध : थंडीच्या दिवसात चमचाभर लिंबू रसात थोडा मध मिसळून रोज सकाळी प्यावे. यामुळे तुमचे चोंदलेले नाक मोकळे होईल.

गरम पाण्याची आंघोळ : नाक चोंदण्याची समस्या असल्यास तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होते. नाक चोंदण्यावर सातत्याने इन्हेलर वापरणेही शरीरासाठी चांगले नाही. त्यामुळे या घरगुती उपायांनी तुम्ही नाक चोंदण्याच्या समस्येवर त्वरित उपचार होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT