आखाडा (जि. हिंगोली), पुढारी वृत्तसेवा : शेवाळा गावाकडून दुचाकीवर येणारे दोन युवक कॅनॉलमध्ये पडले. त्यापैकी एक जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला तर एक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अशी माहिती की, लहरी तालुक्यातील हादगाव येथील दोन युवक शेवाळा गावाकडून आखाडा बाळापूर येथे आपल्या बहिणीकडे आहेर घेऊन येत होते. आखाडा बाळापूर व शेवाळा गावाच्या मधोमध असणाऱ्या उर्ध्व पेनगंगेच्या उजव्या कालव्यामध्ये अचानक पडले. यावेळी त्यातील एक जण प्रवाहात वाहून गेला तर दुसरा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, कॅनॉलच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्याचा शोध घेणे सुरू आहे. कॅनॉलच्या पूलास कठारे नाही आणि दुचाकी वळण आहे. यामूळे हे दुचाकीस्वार कॅनोनमध्ये पडले. तर यापूर्वी या कॅनलमध्ये तीन ते चार युवक मोटरसायकलच्या अपघातात वाहून गेले आहेत. परंतु उर्ध्व पेनगंगा विभागाकडून कठाडे बांधण्याची दखल घेतलेली नाही. घटनास्थळी आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, शिवाजी बोंडले, बालाजी पुंड, नागोराव बाभळे, राजू जगदाडे हे पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.