Latest

‘मला आईकडे सोडा’ : ‘पाक’मध्ये अपहरण झालेल्या हिंदू तरुणीची आपबीती; जबरदस्तीने धर्मांतर आणि लग्न

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानात रजीता मेघवाल कोल्ही या हिंदू तरुणीचे अपहरण करून, धर्मांतर आणि नंतर जबरदस्तीने लग्न लावल्याचा प्रकार उघकीस आला आहे. विशेष म्हणजे ही तरुणी आई-वडिलांकडे जाण्याची मागणी करत असताना तिला सरकारी निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर पाकिस्तानातील मानवी हक्क चळवळीतील संघटना आणि हिंदू संघटनांनी आवाज उठवला आहे. (Hindu woman kidnapped in Pakistan)

दोन महिन्यापूर्वी रजीता हिचे अपहरण करण्यात आले, पण त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तसेच तिचे अपहरण करणारा आशिक अहमदानी या तरुणाबरोबर तिचे जबरदस्तीने लग्नही लावण्यात आले. १५ ऑक्टोबरला तिने पलायन केले. पण त्यानंतर आता तिला निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे. इंडिया टुडेने ही बातमी दिली आहे. पाकिस्तानातील The Rise News या वृत्तसंस्थेने यावर सर्वप्रथम बातमी दिली. पाकिस्तानातील माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यानेही एक्सवर यावर आवाज उठवला आहे.

पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या हक्कावर काम करणारे कार्यकर्ते शिवा कच्ची म्हणाले, "मिरपूर खास या शहरातील याच न्यायालयात एका मुस्लिम मुलीला तिच्या पालकांकडे सोपवण्यात आले होते. पण रजीताच्या प्रकारात मात्र तिला निवारा केंद्रात पाठवण्याचा निर्णय दिला आहे."

पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेचे अपयश | Hindu woman kidnapped in Pakistan

पाकिस्तानातील Aurat Foundation and the Movement for Solidarity and Peace या संस्थेने पाकिस्तानात दरवर्षी अल्पसंख्याक हिंदू आणि ख्रिश्चन धर्मातील किमान एक हजार महिलांचे अपहरण केले जाते असे म्हटले आहे. Responsible for Equality and Liberty (REAL) या संस्थेने पाकिस्तानात महिन्याला २५ हिंदू महिलांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जाते असे म्हटले आहे. पाकिस्तानातील बहुतांश हिंदू समाज हा सिंध प्रांतात आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT