पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध शो बिग बॉस-१७ विषयी नवे अपडेट समोर आले आहे. (Bigg Boss 17) या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कंटेस्टेंटची नावे समोर आली आहेत. आता या शोसाठी कॉमेडियन मुनव्वर फारुकीचे नाव फायनल केल्याचे म्हटलं जात आहे. (Bigg Boss 17)
संबंधित बातम्या –
मुनव्वर फारुकी कॉमेडियन असून तो रोज आपल्या व्हिडिओजमुळे चर्चेत राहतो. मुनव्वरने कॉमेडी शिवाय २०२२ मध्ये कंगना रानौतचा शो 'लॉकअप' मध्येदेखील भाग घेतला होता. कॉमेडियन मुनव्वर फारुकीने हा शोदेखील जिंकला होता, तेव्हापासून तो चर्चेत होता.
मुनव्वर फारूकीचे नाव मागील वर्षीदेखील 'बिग बॉस'साठी चर्चेत होते. पण काही कारणांनी मुनव्वरला या शोमध्ये सहभागी होता आले नाही. तेव्हा मुनव्वर फारूकीने म्हटलं होतं की, जर संधी मिळाली तर 'बिग बॉस' मध्ये नक्कीच जाण्याची इच्छा आहे. आता तो बिग बॉसमध्ये जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. पण, मुनव्वरकडून अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.
मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, मुनव्वरला या शोमध्ये घेण्याचा निर्णय अखेरच्या क्षणी झाला होता. रिपोर्ट्सनुसार, मुनव्वरने शोसाठी होकार दिल्याचे कळते. तसेच मुनव्वरने शोसाठी मोठा रकमेची मागमी केल्याची माहिती समोर आळीय. त्यामुळे मुनव्वर सर्वात महाग स्पर्धक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बिग बॉस छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो आहे. सलमान खानच्या बिग बॉस १७ ची सुरुवात १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे.