पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार गोविंदा आज २१ डिसेंबर आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. एक वेळ अशी होती की, त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो आपल्या मामाच्या घरी राहत होता. पण, त्याचे भाग्य चमकले ते एका पानटपरीवर. (HBD Govinda) पानटपरीवर उभारलेल्या गोविंदावर बीआरचोप्रा कॅम्पच्या मॅनेजरची नजर पडली आणि त्याला पहिला चित्रपट मिळाला. तेथून त्याच्या करिअरची गाडी धावू लागली. (HBD Govinda)
संबंधित बातम्या –
आपल्या तीन दशकाच्या करिअरमध्ये अभिनेता गोविंदाने कोटींची कमाई केली. मुंबईतील जुहूमध्ये तो एका आलिशान घरात राहतो. त्याची एकूण संपत्ती १७० कोटींच्या आसपास सांगितली जाते. रिपोर्टनुसार, गोविंदाचा हा बंगला १६ कोटी रुपयांचा असून तो पत्नी सुनीता आणि आपल्या मुलांसोबत राहतो. गोवींदाचे घर आतून खूप सुंदर आहे. मार्बल फरशीसोबत लिव्हिंग रुमचा प्रत्येक कोपरा सजवण्यात आलं आहे. तसेच इतर खोल्यांना क्लासी लूक देण्यासाठी वुडन वर्क करण्यात आला आहे. घराची बाल्कनी ते गार्डन पर्यंत संपूर्ण एरिया हिरवागार आहे. याचे काही फोटोज गोविंदाने दिवाळीच्या निमित्ताने फॅन्ससाठी शेअर केले होते. गोविंदाचे घर डुप्लेक्स आहे. हॉल एरियमध्ये सोफा असून त्यावर शक्ती कपूरसोबत बसून त्याने फोटो शेअर केले होते.
गोविंदाने आपल्या कुटुंबासमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी तो ब्लॅक कलर आऊटफिटमध्ये दिसला.
video-Viral Bhayani x वरून साभार