अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
माहितीनूसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. हिराबेन यांनी नुकताच जून महिन्यात आपला 100 वा वाढदिवस साजरा केला आहे.