मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतध्ये गुरुवारी पहाटे काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड उकाड्यापासून जरा दिलासा मिळाला. बुधवारी रात्री एक ते दोन च्या सुमारास पूर्वेकडील उपनगरांमध्ये पावसाची सर पडली तर पश्चिमेकडील उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला.
मालवणी फायर स्टेशन आणि गोरेगाव येथे 21 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली तर बोरीवली फायर स्टेशन येथे 19 मिलिमीटर, जोगेश्वरी १७ मिलिमीटर, मरोळ फायर स्टेशन परिसरात 14 मिलिमीटर आणि कांदिवली फायर स्टेशन परिसरात १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या पावसाने काही सखल भागांमध्ये पाणी साचले. परंतु मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे कुठेही वृत्त नाही.
.हेही वाचा