पुणे : पुढारी डिजिटल : पुण्यात गंगाधाम परिसरातील गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीने कमी वेळात रौद्र रुप धारण केले असून ही आग 20 गोदामांपर्यंत पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या 2 तासांपासून ही आग भडकली असून आकाशात दूरवर धुराचे मोठे लोट दिसून येत आहे. तरी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आग विझवण्यासाठी कार्यरत आहेत.
सकाळी साधारण नऊ वाजता या ठिकाणी आग लागल्याचे समोर आले. या आगीच्या भक्ष्यस्थानी सर्वप्रथम मंडपांचा गोदाम पडलं. त्यानंतर ही आग आसपासच्या तीन गोदामांमध्येही पसरली. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाल्याची बातमी नाही.