नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर ही सुनावणी घेण्यात येईल.
तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारने बारा जणांची यादी विधान परिषदेवरील नियुक्तीसाठी पाठवली होती. परंतु, कोश्यारी यांनी या नावांना अखेरपर्यंत मंजुरी दिली नव्हती. राज्यात सत्तांतर होताचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने नवीन यादी पाठवताच जुनी यादी राज्यपालांकडून परत पाठवण्यात आली होती. राज्यपालांच्या या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.