पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय सोमवार २९ मार्च रोजी सुनावणी घेणार आहे. न्यायमूर्ती सचिन दत्ता हे रजेवर असल्याने पीएम मोदींविरोधातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. (PM Modi)
लोकसभा निवडणुकीसाठी धार्मिक देवता आणि पूजास्थळांच्या नावावर मते मागितल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पीएम मोदींविरोधातील याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी (दि.२९) या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आज (दि.२६) सुनावणी होणार होती. पण न्यायमूर्ती सुट्टीवर असल्याने आज सुनावणी होऊ शकली नाही, असे 'लाईव्ह लॉ'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (PM Modi)