पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आज (दि. २९) निवडणूक आयोगात (Election Commission ) सुनावणी पार पडली. पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होईल असे शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले. सुनावणी संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. (Hearing of NCP)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) नेमका कुणाचा याबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगात आपली बाजू मांडण्यासाठी शरद पवार गटाचा आजचा शेवटचा दिवस होता. यानंतर आता गुरुवारपासून अजित पवार गट आपली भूमिका मांडणार आहे. आजच्या सुनावणीनंतर याबाबतची पुढील सुनावणी ४ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती कपिल सिब्बल यांनी दिली.
यापूर्वी शरद पवार गटाच्या वतीने अजित पवार गटाने खोटी कागदपत्र सादर केली होती, राष्ट्रीय कार्यकारणी सहभागी सदस्यांची खोटी माहिती दिली, असे आरोप करत कायदेशीर कारवाई करत तत्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली होती. त्यामुळे आजची सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते.