Latest

एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारा ‘हा’ जगातील सर्वात लहान वयाचा व्यक्ती ठरला

Arun Patil

लंडन : 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात,' असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. अनेक मुले लहान वयातच आपल्या भविष्यातील कामगिरीची चुणूक दाखवून देत असतात. आता आई-वडिलांसोबत विश्वभ्रमंतीला निघालेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याने जे केले त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. हा चिमुकला ब्रिटनचा असून, त्याचे नाव कार्टर डॅलस असे आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारा कार्टर हा जगातील सर्वात लहान वयाची व्यक्ती ठरला आहे. 31 वर्षीय वडील रॉस आणि 31 वर्षीय आई जेडसोबत त्याने हा इतिहास रचला आहे. वडिलांच्या पाठीवर बसून त्याने हा ट्रॅक पूर्ण करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे.

रॉस आणि त्याची पत्नी जेड यांनी त्यांचे स्कॉटलंडमधील घर ऑगस्ट 2023 मध्ये भाड्याने दिले आणि ते विश्वभ्रमंतीला निघाले. हे कुटुंब आधी भारतात आले. त्यानंतर श्रीलंका आणि मालदीवला गेले. गुआसागोमधील हे कुटुंब वर्षभराच्या आशियाच्या ट्रिपवर निघाले आहे. रॉस आणि जेड यांनी 25 ऑक्टोबरला नेपाळमधील समुद्रसपाटीपासून 17,598 फूट उंचीवर असलेल्या दक्षिणेकडील शिखरावर चढाई करण्यास सुरुवात केली.

कार्टरपूर्वी हा विक्रम झेक प्रजासत्ताकमधील एका 4 वर्षांच्या मुलाने केला होता. मुलाचे कौतुक करताना वडील रॉस म्हणाले की, सगळ्या ट्रॅकमध्ये आमच्या दोघांपेक्षा त्याने सर्व गोष्टी अतिशय काटेकोर आणि प्रामाणिकपणे केल्या. आम्हा दोघांना उंचीवर गेल्यावर थोडा त्रास झाला; पण कार्टर हे सगळे मस्त एन्जॉय करत होता. बेस कॅम्पला जाण्यापूर्वी तिथल्या दोन स्थानिक डॉक्टरांनी त्याला चेक केले होते. अगदी बेस कॅम्पला जाण्यासाठी त्याची प्रकृती योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्याची रक्ताची तपासणीही करण्यात आली होती. ते टेस्ट रिपोर्ट पाहून तर आम्ही चकितच झालो.

आम्हा दोघांपेक्षा त्याचे रिपोर्ट खूप चांगले होते; मग काय आम्ही ट्रॅकवर जाण्यासाठी तयारी करू लागलो. आम्ही फूड जॅकेट आणि दोन स्लिपिंग बॅग विकत घेतल्या. कुठलेही प्लॅनिंग न करता आम्ही ट्रॅकवर जाण्याचा निर्णय घेतला होता. 'काठमांडूला पोहोचल्यानंतर 24 तासांच्या आत आम्ही मिशनवर निघालो.' आपले कुटुंब या ट्रॅकसाठी पूर्णपणे तयार असल्याचा त्यांना विश्वास होता. हे संपूर्ण कुटुंब बर्फाळ प्रदेशातील थंड पाण्याच्या तलावात आंघोळ करत होते. त्यांनी नियमितपणे श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करून हे मिशन पूर्ण केलेे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT