Hardeek- Akshaya 
Latest

Hardik-Akshaya Engagement : राणादा-पाठक बाईंचा अखेर एकमेकांत जीव गुंतला, गुपचूप उरकला साखरपुडा!

रणजित गायकवाड

मुंबई : पुढारी ऑनलाईन

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले अभिनेता हार्दिक जोशी उर्फ राणादा आणि अभिनेत्री अक्षया देवधर उर्फ पाठक बाई यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. दोघांचा नुकताच साखरपुडा पार पडला असून अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकौंटवरून या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होत असून चाहते लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत. राणादा आणि पाठक बाईं यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत आवडती जोडी होती. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या जोडीची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावार अधिराज्य गाजवले. मालिकेनं निरोप घेतल्यानंतरही त्यातील मुख्य भूमिका चाहत्यांच्या स्मरणात कायमच्या राहिल्या. राणादा म्हणजे हार्दिक आणि पाठक बाई म्हणजे अक्षया दोघेही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. अक्षया सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांचे लक्षवेधून घेत असते. तर हार्दिकही नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. या दोघांच्या खास नात्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती, पण याबद्दल दोघांनीही कधी स्पष्टपणे सांगितले नव्हते परंतु आता या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का देत नवीन नाते जगासमोर आणले आहे. या दोघांनी साखरपुडा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT