happy birthday kiara advani  
Latest

HBD Kiara Advani : ‘किसिंग सीन’ देऊन रातोरात स्टार झाली कियारा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहिद कपूरच्या कबीर सिंगमध्ये किसिंग सीन  देऊन अभिनेत्री कियारा आडवाणी (HBD Kiara Advani) रातोरात स्टार झाली. तिच्या किस सीनची एकच चर्चा झाली. हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यावेळी कियाराचे खूप कौतुकही झाले. कियाराने अनेक दिग्गजांबरोबर चित्रपट दिले; पण तिची सर्वाधिक चर्चा कबीर सिंहमधून झाली. चित्रपट आणि लस्ट स्टोरीजसारख्या वेब सीरीजमध्येही कियाराने इंटिमेट सीन देऊन सर्वांनाच धक्का दिला. अनेक आघाडीच्या अभिनेत्‍यांसाेबत कियाराचे नाव जोडले गेले. आज कियारा आडवाणी (३१ जुलै) हिचा वाढदिवस. यानिमित्त जाणून घ्या, तिच्याविषयीच्या या खास गोष्टी. (HBD Kiara Advani)

शाहिद कपूर स्टारर चित्रपट 'कबीर सिंग' फेम अभिनेत्री कियारा अडवाणी ३१ जुलै रोजी तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म ३१ जुलै, १९९२ रोजी मुंबईत झाला होता. कियाराने २०१४ मध्ये 'फगली' चित्रपटातून पदार्पण केले होते. २०१६ मध्ये आलेल्या 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून कियाराला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. यामध्ये तिने क्रिकेटर धोनीची पत्नी साक्षीची भूमिका साकारली होती. कियाराने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून केले आणि तिने अनुपम खेर यांच्या अभिनय शाळेतून अभिनयाचे बारकावे शिकले.

आज चित्रपटांमध्ये नाव कमावणाऱ्या कियाराला सांगितले जाते की, तिच्या वडिलांना ती चित्रपटात दिसणे कधीच आवडले नाही. पण, जेव्हा त्यांनी आमिर खानचा '३ इडियट्स' पाहिला तेव्हा त्यांनी कियाराला अभिनयात करिअर करू दिले. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या कियाराच्या 'कबीर सिंह' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे रेकॉर्ड केले. या चित्रपटात कियाराने शाहिदच्या  मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

कियारा सोशल मीडियावरही सक्रिय आहे. ती आजच्या काळातील तरुण आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या इन्स्टा अकाऊंटवर तिचे लेटेस्ट फोटोज अपडेट करत असते. कियारा तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. ती अनेकदा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते.

अक्षय कुमारसोबतही केलंय काम

कियाराने अक्षय कुमार-करीना कपूरसोबत 'गुड न्यूज'मध्येही काम केले आहे. कियारा चित्रपटांसोबत वेब सीरीजदेखील करत आहे, जिथे तिचे काम खूप पसंत केले जात आहे. कियाराने नेटफ्लिक्सच्या वेबसीरिज 'लस्ट स्टोरीज'मध्ये खूप बोल्ड सीन्स दिले होते. या मालिकेतील त्याच्या व्यक्तिरेखेने मीडिया आणि प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा केली.

या सीनसाठी कियाराला ट्रोलदेखील करण्यात आले होते. पण, तिने नेहमीच तिचे काम सकारात्मकतेने घेतले होते. कियाराच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर, तिचे नाव अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत जोडले गेले होते. त्यांच्या लव्ह लाईफच्या बातम्यांनी बरीच चर्चा केली होती.

जेव्हा कियाराने डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी मोठ्या हिरव्यागार पानांमागे टॉपलेस पोज दिली. तेव्हा सोशल मीडियावर बरेच मीम्स वेगाने व्हायरल झाले. कियाराने स्वत: तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे मीम्स शेअर केले आहेत.

यावर्षी मार्चमध्ये कियारा आणखी एका वेब सीरिज 'गिल्टी'मध्ये दिसली होती. जी चाहत्यांना खूप आवडली होती. ज्यामध्ये कियाराचा अभिनय खूप आवडला होता. कियाराने साऊथ चित्रपटांमध्येही नशीब आजमावले आहे.

साऊथ चित्रपटसृष्टीतही ती खूप लोकप्रिय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT