karan singh grover  
Latest

HBD Karan Singh Grover: माझ्या हसण्याचं कारण तूच आहेस म्हणत बिपाशाने करणला केलं विश (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : करणसिंग ग्रोव्हर हा कायम विविध भूमिकांनी प्रेक्षकांची मन जिंकत असतो. त्याचा आगामी फायटरमधील भूमिकेने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (HBD Karan Singh Grover) प्रभावी कामगिरीने त्याने आजवर प्रेक्षकांना आपलंसं केलं. 'दिल मिल गए' मधील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासून करण एक सातत्यपूर्ण अभिनय करत राहिला आणि आजही तितक्याच ताकदीने अभिनय करून सगळ्यांचा हार्टथ्रोब बनला आहे. आज करणचा २३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे.  बिपाशा बसूने इन्स्टाग्रामवर करणचा एक व्हिडिओ शेअर करून हटके शुभेच्छा दिल्या आहेत. (HBD Karan Singh Grover)

मनोरंजन विश्वात पदार्पण करणाऱ्या 'दिल मिल गए' या प्रतिष्ठित मालिकेत, करणने एका मोहक डॉक्टर अरमान मलिकची भूमिका साकारली होती, ज्यामुळे त्याला लगेचच दूरदर्शनच्या प्रेक्षकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये नाव लौकीक मिळालं.'दिल मिल गए' मधील त्याच्या यशानंतर करणने यशाची शिखरे चढत राहिला आणि लोकप्रिय टेलिव्हिजन कलाकार पैकी एक झाला.

'कुबूल है' द्वारे त्यांनी असद अहमद खानच्या भूमिकेत दमदार अभिनय केला. तो बॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप सोडत राहिला आणि रुपेरी पडद्यावर प्रवेश करणाऱ्या मोजक्या टेलिव्हिजन स्टार्सपैकी एक बनला. एका माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमात जाणे हे आव्हान असताना त्याने सहजरीत्या अभिनय साकारून स्वःची ओळख निर्माण केली. २००८ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले 'अलोन' द्वारे प्रसिद्धी मिळवली. यामध्ये त्याने बिपाशा बसूसोबत भूमिका केली होती.

त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'फायटर' चित्रपटाने त्याला यश आणि स्पॉटलाईटची नवी झलक दाखवली. २०१९ मध्ये करणने 'कसौटी जिंदगी की २' मध्ये श्री ऋषभ बजाजच्या भूमिकेसह टेलिव्हिजनवर पुनरागमन केले.

त्याने 'BOSS: बाप ऑफ स्पेशल सर्व्हिसेस'मध्ये डिजिटल पदार्पण करून त्यानंतर २०२० मध्ये 'डेंजरस' या वेब सीरिजमध्ये त्याच्या आकर्षक कामगिरीने धमाल केली. वर्क फ्रंटवर करणने ब्लॉकबस्टर 'फायटर' मध्ये कॅप्टन सरताज 'ताज' सिंगची भूमिका साकारली, ज्याने बॉक्स ऑफिसवर ३५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT