kangana ranaut : कंगनाने नाकारला होता ‘डर्टी पिक्चर’ www.pudhari.news 
Latest

HBD Kangana Ranaut : छोट्या गावातून आलेली कंगना बॉलिवूडची क्वीन कशी झाली?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूडमध्ये आपल्या हिंमतीवर ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कंगना राणौत (HBD Kangana Ranaut) एक छोट्या गावातूनआपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी  मायानगरी मुंबईत आली. वयाच्या १५ व्या वर्षी पळून  कंगना मुंबईत आली खरी, पण तिला कुठं माहितं होतं की, तिच्यासोबत काय घडणार आहे? पण, कंगना सर्वांना पुरून उरली. तिने धाडसाने मुंबईत आपलं विश्व निर्माण करत ती बॉलिवूडची क्वीन झाली. आज तिचा वाढदिवस, जाणून घेऊया तिच्याविषयी… (HBD Kangana Ranaut)

HBD Kangana Ranaut
Kangana Ranaut

कंगनाने मुलाखतीत सांगितलं होतं की, तिची मोठी बहिण रंगोलीचा जन्म झाला होता, तेव्हा घरचे खुश होते. पण, दुसऱ्यांदा पुन्हा मुलगी झाली (कंगनाचा जन्म) म्हणून घरचे नाराज होते.

Kangana Ranaut
Kangana Ranaut

१२ वी नापास होऊन दिल्लीत आली

कंगना म्हणाली होती की, तिचे आई-वडील तिला डॉक्टर करणार होते. पण, ती १२ परीक्षेत नापास झाली. ती अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेऊन दिल्लीत आली. दिल्लीत राहून तिने थिएटर डायरेक्टर अरविंद गौड यांच्याकडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. अनेक नाटकांमध्ये काम केलं.

Kangana Ranaut

पैशासाठी लाचार असलेल्या कंगनाने आशा सोडली नाही

कंगनाने सांगितले होते की, सुरुवातीच्या काळात अनेक माणसांकडून फसवणूक झाली. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने धोका दिला. तिला खोलीत कोंडून ठेवले. संधी मिळताच तिने तेथून पळ काढला होता. स्ट्रगलच्या काळात वडिलांकडून आर्थिक मदत न मिळाल्याने तिने अनेकदा केवळ भाकरी किंवा लोणचे खाऊन दिवस काढले. कंगनाने चित्रपटात काम करावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा नव्हती. यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला. २००७ मध्ये कंगनाचा 'लाईफ इन अ मेट्रो' हा चित्रपट आला. या चित्रपटानंतर कंगनाच्या कुटुंबीयांनी तिच्याशी पुन्हा बोलणे सुरू केले.

Kangana Ranaut

कॉफी पिताना मिळाला पहिला चित्रपट

२००५ मध्ये दिग्दर्शक अनुराग बसूने कंगनाला एका कॅफेमध्ये कॉफी घेताना पाहिले आणि चित्रपटाची ऑफर दिली. कंगनाने २००६ मध्ये आलेल्या 'गँगस्टर' या थ्रिलर चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात झाली. 'गँगस्टर' या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

Kangana Ranaut

चार राष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी

कंगनाला तिचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार २००८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट फॅशनसाठी मिळाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये 'क्वीन'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. २०१५ मध्ये 'तनु वेड्स मनु'साठीदेखील कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. आता २०२१ मध्ये ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिला 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'पंगा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

Kangana Ranaut

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT