anushka sharma  
Latest

HBD Anushka Sharma : फिट मॉम बनून अनुष्का शर्माचे पुन्हा कमबॅक

स्वालिया न. शिकलगार

दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर अनुष्काने फिट मॉम बनून पुन्हा कमबॅक केले आहे. एका मोबाईलच्या जाहिरातीत ती झळकली. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये ती पिट दिसते. अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडपासून लांब आहे; मात्र तरीही ती नेहमीच चर्चेत असते. अनुष्का काही दिवसांपूर्वीच भारतात परतली आहे. मुलगा अकायला लंडनमध्ये जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच अनुष्का भारतात आली आहे.

आता अनुष्काने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे आणि ती सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे. या व्हिडीओत अनुष्का खूपच फिट दिसत आहे. व्हिडीओमध्ये अनुष्का व्हॅनिटी व्हॅनमधून उतरताना दिसत आहे. त्यानंतर तिचा एक छोटा कुत्रा दिसतो. हा कुत्रा तिच्या मागे मागे येतानाही दिसत आहे. त्यानंतर अनुष्काही त्या कुत्र्याचे अनेक फोटो काढताना दिसत आहे. इतकेच नाही, तर कुत्र्याला घेऊनही फोटो काढताना अनुष्का दिसत आहे. आता अनुष्काने परत अभिनयाला सुरुवात केल्याचे व्हिडीओनंतर दिसत आहे.

अनुष्काच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो या सिनेमात अनुष्का शेवटची दिसली होती. अनुष्का आणि विराट कोहली यांच्या पहिल्या मुलीचे नाव वामिका आहे, तर मुलाचे नाव अकाय आहे. अकायची झलक चाहत्यांना अनुष्का आणि विराटकडून अद्याप दाखवण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT