kajol-ajay devgn  
Latest

HBD Ajay Devgn : काजोलने बर्थडेलाच अजय देवगनला मारला टोमणा; मजेशीर पोस्ट पाहून…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : काजोलने जन्‍मदिनी अजय देवगनला टोमणा मारत मजेशीर पोस्‍ट लिहिली आहे, तुम्हाला देखील हसू आ‍वरणार नाही. बॉलीवूड सुपरस्‍टार अजय देवगन मंगळवार, २ एप्रिल रोजी ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. मागील ३३ वर्षांत १०० हून अध‍िक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. (HBD Ajay Devgn ) अजयचा स्वभाव मुळात शांत आणि गंभीर आहे. आता त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोलने अशी काही पोस्‍ट केली आहे की, तुम्हाला हसू आवरणार नाही. काजोलने अजयचा एक फोटो शेअर केला आहे आणि सोबत एक मजेशीर नोट लिहिली आहे. काजोलने या मजेशीर नोटमध्ये काय लिहिलंय पाहुया. (HBD Ajay Devgn )

काजोलने इन्स्टाग्रामवर मंगळवारी सकाळी अजय देवगनचा एक व्हेकेशन फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्‍व‍िम‍िंग पुलाच्या किनारी काळा गॉगल घालून निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे. अजय देवगनच्या धीर-गंभीर स्‍वभावावर मस्‍ती मूडमध्ये कटाक्ष करत काजोलने कॅप्‍शनमध्ये लिहिलं, 'कारण मला माहिती आहे की, तू तुझ्या वाढदिवसाविषयी इतका उत्साहित आहेस की, केकविषयी विचार करत मुलांप्रमाणे उड्या मारत आहेस. आणि टाळी वाजवून गोल-गोल फिरत आहेस…मी शुभेच्छा देऊन तुझ्या या दिवसाची सुरुवात करते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.'

'तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर नक्की शेअर करा'

आम्ही सर्वांनी अजय देवगनला या प्रकारे आनंदात उड्या मारताना कधीही पाहिलेले नाही. मजेशीर आहे की, आपल्या पोस्टाच्या अख‍ेरीस काजोलने देखील यावर चेष्टा केली. तिने फॅन्सना म्हटले की, 'जर कोणाकडे अशा प्रकारचा कोणताही व्हिडिओ असेल तर कृपया मला पाठवा.'

अजय देवगनने एका मुलाखतीत म्हटले होते की, मला शांत राहणे खूप आवडते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT