gunjan sinha 
Latest

Jhalak Dikhhla Jaa 10 ची विजेती ठरली गुंजन सिन्हा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीवरील प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा १०' चा (Jhalak Dikhhla Jaa 10) ग्रँड फिनाले २७ नोव्हेंबर रोजी झाला. लोकांना या हंगामात एक उत्कृष्ट विजेतादेखील मिळाला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, ८ वर्षीय गुंजन सिन्हा या डान्स रिअॅलिटी शोची विजेती ठरलीय. शोच्या दहाव्या सीझनसोबतच ट्रॉफीही जिंकली आहे. फिनालेवर, शोचे परीक्षक माधुरी दीक्षित, करण जोहर, टेरेन्स लुईस आणि नोरा फतेही यांनी गुंजन सिन्हाला २० लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि एक ट्रॉफी दिली. या शोच्या फिनालेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चांगल्या आणि प्रतिभावान स्पर्धकांना मागे टाकत गुंजनने या शोमध्ये विजेतेपद पटकावले आहे. (Jhalak Dikhhla Jaa 10)

८ वर्षांची गुंजन सिन्हा विजेती ठरली

'झलक दिखला जा १०' या डान्स रिअॅलिटी शोची विजेती गुंजन सिन्हा ही गुवाहाटीची रहिवासी आहे. तेजस वर्मा आणि सागर बोरा हे तिचे कोरिओग्राफर आहेत. तिच्या विजयानंतर गुंजन खूप आनंदी दिसत आहे.

आता अभ्यासावर लक्ष केंद्रित

मिळालेल्या माहितीनुसार, गुंजन सिन्हा याआधीही अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. तिच्या डान्स मूव्ह्सची सर्वांनाच खात्री आहे. हा शो केल्यानंतर ती एक चांगली डान्सर बनल्याचे गुंजनचे म्हणणे आहे. शो जिंकल्यानंतर गुंजनने सांगितले की, आता ती तिच्या शहरात परतणार आहे. तिला सध्या तिच्या अभ्यासावर आणि शाळेवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

शाळेत मित्रांना भेटायला उत्सुक

गुंजन सिन्हा म्हणाली- मी माझा अभ्यास कधीच सोडला नाही. कारण मी मुंबईतून ऑनलाईन क्लासेस करत होते. शोमुळे मी बरेच दिवस शाळेत जाऊ शकले नाही. मला माझ्या मित्रांना भेटायचे आहे. मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. माझा अभ्यास पूर्ण करण्यासोबतच मी माझ्या नृत्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT