IPL 2024

GT vs DC : दिल्लीसमोर गुजरातचा डाव गडगडला; विजयासाठी 90 धावांचे लक्ष्य

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क :  दिल्लीविरूद्धच्या सामन्यात टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना गुजरातचा डाव पत्या प्रमाणे कोसळला. फलंदाजी करताना केवळ 48 धावांत गुजरातच्या 6 विकेट पडल्या. कर्णधार शुभमन गिल (8), अभिनव मनोहर (8), रिद्धिमान साहा (2), मोहित शर्मा (2), डेव्हिड मिलर (2) आणि नूर अहमद (1) यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. साई सुदर्शनने 12 आणि राहुल तेवतियाने 10 धावांचे योगदान दिले. शाहरुख खानचे खातेही उघडता आले नाही. गोलंदाजीमध्ये दिल्लीकडून मुकेश कुमारने तीन, इशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
(GT vs DC)

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.

इम्पॅक्ट प्लेयर : अभिषेक पोरेल, लिझाद विल्यम्स, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, ललित यादव.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर.

इम्पॅक्ट प्लेयर : शरथ बीआर, मानव सुथार, शाहरुख खान, रविश्रीनिवासन साई किशोर, दर्शन नळकांडे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT