Latest

GT vs RR : गुजरातचा राजस्थानवर दणदणीत विजय, ९ विकेट्सने उडवला धुव्वा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : राशिद खानची फिरकी, हार्दिक पंड्या आणि वृद्धीमान सहाच्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरात टायटन्स राजस्थानवर ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. राजस्थानने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय केला होता.

दरम्यान, राजस्थानचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरल्यानंतर राशिद खानच्या फिरकीने त्यांना चांगलेच नाचवले. राशिदची फिरकी आणि वेगवान गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर राजस्थानने अक्षशर: नांगी टाकली. १७.५ षटकामध्ये राजस्थानने सर्वबाद ११८ धावा केल्या आणि गुजरातसमोर केवळ ११९ धावांचे लक्ष्य ठेवले. राजस्थानच्या ११९ धावांच्या पाठलाग गुजरातने सहरितीने १३.५ षटकांमध्ये केला. गुजरातकडून वृद्धीमान सहाने ३४ चेंडूमध्ये ४१ धावा, शुभमन गिल ३५ चेंडूमध्ये ३६ धावा आणि हार्दिक पंड्याने आक्रमक फलंदाजी करत १५ चेंडूमध्ये ३९ धावा केल्या.

तत्पूर्वी, राजस्थानकडून संजू सॅमसनने ३० धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला १५ धावांपेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. गुजरातच्या गोलंदाजीसमोर राजस्थानने अक्षरश: नांगी टाकली. गुजरातकडून राजस्थानने ४ षटकांमध्ये केवळ १४ धावा देत ३ विकेट्स पटकावल्या. नूर अहमदने २ तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, जोशुआ लिटलने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT