पुढारी ऑनलाईन डेस्क
गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील हालवद औद्योगिक वसाहतीमधील मीठ कारखान्याची भिंत कोसळून १२ कामगार ठार झाले. ही दुर्घटना आज दुपारी घडली. आपत्तकालीन पथक दुर्घटनास्थळी दाखल झाले असून, युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मोरबी येथील मीठ उत्पादन करणार्या कारखान्यातील भिंत कोसळली. यामध्ये १२ कामगार जागीच ठार झाले. मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्री मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. युद्धपातळीवर मदतकार्य सुरु असून भिंतीखाली काही गाडले गेल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.