Latest

उमरानने मागितली हार्दिक पंड्याच्या पत्नीची माफी? फोटो व्हायरल

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग 2022 (Indian Premier League 2022) मध्ये पहिल्यांदाच पराभूत झालेल्या संघातील खेळाडूला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे. सनरायझर्स हैदराबादकडून गुजरात टायटन्सच्या पाच खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवणाऱ्या उमरान मलिकला (umran malik) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. गुजरात टायटन्सने हा सामना शेवटच्या चेंडूवर पाच विकेट्स राखून जिंकला. सामन्यानंतर एक फोटो चर्चेत आहे, ज्यामध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (hardik pandya) उमरानला पकडून उभा आहे आणि हा युवा वेगवान गोलंदाज हात जोडून उभा आहे. विस्डेन इंडियाच्या अधिकृत ट्विटर पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

हा फोटो शेअर करत 'सॉरी सीनियर!' असे कॅप्शन लिहिले आहे. हा फोटो हलक्याफुलक्या पद्धतीने शेअर करण्यात आला असून त्यावर आलेल्या कमेंट्सही मजेदार आहेत. एका चाहत्याने लिहिले की उमरान स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकची (natasa stankovic) माफी मागत आहे.

उमरानने (umran malik) या सामन्यात शुभमन गिल, हार्दिक पंड्या, वृद्धिमान साहा, डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यापैकी हार्दिक हा एकमेव फलंदाज होता, जो झेलबाद झाला, बाकीच्या चौघांना त्याने क्लीन बोल्ड केले. दरम्यान, हात जोडून उभा असलेला उमरान आणि त्याला पकडलेल्या हार्दिकचा हा फोटो तुमचेही मन जिंकेल. आयपीएलमध्ये जवळपास प्रत्येक सामन्यानंतर अशी दृश्ये पाहायला मिळतात, जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावरील शत्रुत्व विसरून खिलाडू वृत्तीने हसत-खेळत दिसतात.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT