Latest

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार सकारात्मकच : चंद्रशेखर बावनकुळे

रणजित गायकवाड

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : इतर कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी करून दुस-या समाजाला देणे योग्य नाही. परंतु मराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे. कायद्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा फडणवीस सरकारने जो निर्णय घेतला होता तो कसे टीकवला जाईल, मराठा समाजाचे जे आर्थिक सामाजिक सर्वेक्षण फडणवीस सरकारच्या काळात केले गेले होते त्या सर्वेक्षणाप्रमाणे पुढे कसे जाता येईल आणि मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कशा करता येईल याचा प्रयत्न सध्याचे सरकार करीत आहे. असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

बावनकुळे पुढे म्हणाले, सरकारने आज (दि. 4) बैठकही घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरुवातीपासून सकारात्मक आहेत. ओबीसीतून आरक्षण द्या ही जी काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची भूमिका आहे ती योग्य नाही. वडेट्टीवार असे का बोलले मला माहित नाही. राजकारणापोटी इतका खाली स्तर गाठणे हे योग्य नाही. खरेतर आरक्षणाच्या टक्केवारीत वढ केली जावी याबबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. फडणवीस सरकारच्या काळामध्ये जी टीम होती या सर्वांनी बसून सगळ्यांनी सोशल इकॉनॉमिक्स सर्वे केला होता. सुप्रीम कोर्टात मराठा समाज कसा मागास आहे हे महाविकास आघाडी सरकार आणि विजय वडेट्टीवार मांडण्यात अपयशी ठरले होते. आज आमच्यावर टीका करणाऱ्या शरद पवारांनी हे सगळे कोर्टामध्ये का मांडले नाही? पण ते आता आकांडतांडव करत आहेत. त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करणारे नेते जबाबदार आहेत असा आरोप बावनकुळे यांनी केला.

सरकारने आपली भूमिका कालच स्पष्ट केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत कालच (दि. 3) स्पष्टपणे सांगितले आहे. लाठीचार्जची चौकशी केली पाहिजे हे मान्यच आहे. कोणत्या पद्धतीने लाठीचार्ज झाला चौकशी समिती नेमली आहे. ही समिती चौकशी करून अहवाल सादर करे, त्यानंतर निर्णय घेतला जाईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक पाऊल टाकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT