दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सरकारने छोट्या ठेव योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये पोस्ट ऑफिस मुदत ठेव, NSC (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांचा समावेश आहे. अर्थव्यवस्थेतील व्याजदर मजबूत करण्यासाठी या ठेव योजनांच्या व्याजदरात १ जानेवारीपासून १.१ टक्के वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. (Government Hikes Interest Rates)
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि बालिका बचत योजना सुकन्या समृद्धीवरील व्याजदरात बदल करण्यात आलेला नाही. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वर 1 जानेवारीपासून सात टक्के व्याज मिळेल, सध्या ते 6.8 टक्के आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर सध्याच्या ७.६ टक्क्यांऐवजी ८ टक्के व्याज मिळेल. (Government Hikes Interest Rates)
1 जानेवारी 2023 पासून पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट योजनांवरील एक ते पाच वर्षे कालावधीच्या व्याजदरात 1.1 टक्के वाढ होईल. मासिक उत्पन्न योजनेत व्याजदरही ६.७ टक्क्यांवरून ७.१ टक्के करण्यात आला आहे. छोट्या ठेव बचत योजनांच्या व्याजदरात झालेली वाढ ही मोदी सरकारची नवीन वर्षाची भेट म्हणून पाहिली जात आहे. सध्या ही वाढ जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी करण्यात आली आहे.
सरकारने पोस्ट ऑफिसच्या एक वर्षाच्या बचत योजनेवरील व्याजदर पूर्वी 5.5% वरून 6.6% केला आहे. तर 2 वर्षांच्या योजनेवर 6.8% दराने व्याज मिळेल, जे आधी 5.7% होते. 3 वर्षांच्या योजनेवरील व्याजदर 6.9% पर्यंत वाढवण्यात आला आहे, जो पूर्वी 5.8% होता. त्याच वेळी, पाच वर्षांच्या योजनेवर 7% दराने व्याज दिले जाईल, जे आधी 6.7 टक्के होते.
व्याजदरांचे तिमाही आधारावर केले जाते पुनरावलोकन
केंद्र सरकार अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचा तिमाही आधारावर आढावा घेते. श्यामला गोपीनाथ समितीने छोट्या बजेटच्या योजनांसाठी व्याजदर मोजण्याचे सूत्र दिले होते. समितीच्या शिफारशींनुसार, विविध योजनांचे व्याजदर समान मुदतीच्या केंद्र सरकारच्या रोखे उत्पन्नापेक्षा 25 ते 100 bps जास्त असावेत.
अधिक वाचा :