गोवा

वास्कोत भरदुपारी तरुणाची हत्या; दोघांना फोंड्यात अटक

अनुराधा कोरवी

वास्को ः पुढारी वृत्तसेवा काटेबायणा येथे सोमवारी भर दुपारी चारजणांनी कोयता व चाकूचे वार करून उमेश हरिजन या तीस वर्षीय युवकाचा निर्घृण खून केला. पूर्ववैमनस्यातून सदर खुनाची घटना घडली. चार संशयितांपैकी दोघांना फोंडा पोलिसांना पाठलाग करून ताब्यात घेऊन मुरगाव पोलिसांकडे सोपविले.

उमेश हा सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास बायणातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात आला होता. तेथे श्रीचे दर्शन घेऊन महापूजेचा महाप्रसाद जेवल्यावर तो निघाला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा मित्र अशोक चलवादी होता. ते काटेबायणा येथील उड्डाणपुलाजवळ पोहोचले असता तेथे दबा धरून असलेल्या काहीजणांनी त्यांना अडविले. त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू झाल्यावर त्या चौघाजणांनी उमेश याला उड्डाण पुलाखाली नेले.

तेथे खाली पाडल्यावर एका संशयिताने पाठीवर कोयत्याने वार केला. त्यानंतर इतरांनी त्यांच्याकडे असलेल्या हत्यार्‍यांनी सपासप वार केले. धारदार कोयते व चाकूचे वार झाल्याने उमेश तेथेच गंभीर जखमी होऊन पडला. अशोक याने उमेश याला सोडविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला धमकी देण्यात आल्याने तसेच त्या हल्लेखोरांच्या हातात हत्यारे पाहताच अशोक तेथे लपला. त्याने सदर घटनेची माहिती उमेश याच्या भावाला दिली.

उमेश याचा भाऊ विजय हा तेथे कार घेऊन येईपर्यंत त्या हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला. उमेश याला उपचारासाठी त्या कारमध्ये घालण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या उमेशला उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

उमेश याच्या शरीरावर दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न

फोंडा : वास्कोतील खून प्रकरणातील दोन संशयितांना फोंडा पोलिसांनी संध्याकाळी फिल्मी स्टाईलने पकडले. खून करून पळालेल्यांपैकी दोघेजण स्कूटरवरून फोंड्याच्या दिशेने आल्याची माहिती वास्कोतील पोलिसांनी फोंडा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी बाणस्तारी येथे नाकाबंदी केली.

यावेळी एका स्कूटरवरील दोघा स्वारांनी ही नाकाबंदी तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, फोंडा पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; पण दोघांनीही स्कूटरवरून जुने गोवेच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करीतच पोलिसांनी या दोघांनाही जुने गोवे येथे गाठले व ताब्यात घेतले. हे दोघेहीजण बायणा – वास्को येथील रहिवासी असून, त्यांची नावे अमीर हुसेन व दीपक साहनी अशी आहेत. पकडलेल्या दोघाही जणांना त्यानंतर फोंडा पोलिसांनी वास्को पोलिसांच्या ताब्यात दिले. फोंडा पोलिसांच्या या कामगिरीचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

बायणा वस्तीच्या आठवणी

या घटनेमुळे बायणा वेश्यावस्तीमध्ये अठरा वर्षांपूर्वी होणार्‍या गुन्ह्यांच्या स्मृती जाग्या झाल्या. बायणा वेश्यावस्तीमुळे तेथे खून, मारामार्‍या नेहमीचेच झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बायणा वेश्यावस्ती जून 2004 मध्ये पूर्ण बायणा खून झालेल्या ठिकाणी मुरगाव पोलिस तपास करताना, तर इन्सेटमध्ये जमीनदोस्त केली.

खुनासाठी वापरलेली हत्यारे.

वास्कोत भरदुपारी तरूणाची हत्या धारदार हत्यार्‍यांचे काही वार झाल्याचे उघड झाले. पोलिसांना खुनासाठी वापरण्यात आलेले दोन कोयते, संशयितांची चप्पल व इतर वस्तू तेथे मिळाल्या आहेत. वास्कोचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश कुमार, मुरगावचे पोलिस निरीक्षक राघोबा कामत, वास्कोचे निरीक्षक कपिल नायक, वेर्णाचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस तसेच फोरेन्सिक पथक तेथे पोहचले. खुनाची घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले. उमेश हा काटेबायणा येथे बार चालवित होता. बायणातील हाऊसिंग कॉलनीमध्ये तो राहतो. त्याच्यामागे पत्नी आहे.

उमेश याने एक दीड वर्षापूर्वी त्या चार संशयितांपैकी एकाच्या भावाला मारहाण केली होती. तो राग मनात ठेऊन त्या चार जणांनी सोमवारी दुपारी डाव साधला. त्या हल्लेखोरयांनी वापरलेले कोयते पाहता त्यांनी खुनाचा कट रचल्याचे स्पष्ट होते. बदला घेण्यासाठी ते वाट पाहत होते. सोमवारी त्यांनी डाव साधला. खुन केल्यावर चौघे संशयित पळाल्याने त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी गोव्यातील ठिकठिकाणच्या पोलिस स्थानकांना संदेश पाठविले होते.त्यामुळे फोंडा पोलिसांच्या तावडीत दोघेजण सापडले. त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्याची कामगिरी फोंडा पोलिसांनी बजाविली. या खूनप्रकरणी मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत , पोलिस उपअधीक्षक राजेश कुमार तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT