गोवा

वास्को: स्कुबा डायव्हिंग करताना पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू

अनुराधा कोरवी

वास्को: पुढारी वृत्तसेवा : स्कुबा डायव्हिंगसाठी समुद्रात उतरलेले विक्रोळी- मुंबईतील येथील प्रकाश खेर (७२) यांचा जलक्रिडा करत असताना हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. त्यांना किनाऱ्यावर आणून उपचारासाठी इस्पितळात नेले असता मृत घोषित केले. याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी पंचनामा केला आहे.

बायणा किनाऱ्यावरून स्कुबा डायव्हिंगसाठी बोटी सुरू केल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांचे पाय बायणा किनाऱ्याकडे वळू लागले आहेत. प्रकाश व त्यांचे कुटुंब शनिवारी सकाळी बायणा किनाऱ्यावर आले होते. त्यानंतर ते स्कुबा डायव्हिंगसाठी बोटीने गेले. समुद्रात उतरल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तेथून दुसऱ्या बोटीने त्वरित किनाऱ्यावर आणले. तेथे असलले या दृष्टीच्या जीवरक्षकांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.

तसेच कृत्रिम श्वासोच्छवास दिला. त्यांना इस्पितळात नेण्यासाठी १०८ ला फोन करण्यात आला. मात्र, सदर रुग्णवाहिका येण्यास वेळ लागल्याने तेथील काही स्थानिकानी त्यांना खासगी मोटारीने चिखली इस्पितळात नेले.

SCROLL FOR NEXT