गोवा

वास्को येथे भरधाव कारने महिलेला चिरडले; कारसह पळालेल्या चालकास अटक

अनुराधा कोरवी

वास्को: पुढारी वृत्तसेवा : बेदरकारपणे वाहन चालवून पादचाऱ्यांना, अन्य वाहन चालकांना चिरडण्याचे प्रकार सुरूच आहेत. वास्कोत शुक्रवारी थरकाप उडवणारा अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ महिलेला कारने फरफटत नेले. त्या जागीच ठार झाल्या. माणुसकीला काळिमा म्हणजे कारचालक कारसह पळून गेला होता. त्याला नंतर पकडले.

वरुणपुरी – शांतीनगरदरम्यानच्या महामार्गावर ही घटना घडली. वेगवान कारची धडक रस्ता ओलांडणाऱ्या रझिया बेगम मुजावर (वय ६९) यांना बसल्याने त्या जागीच ठार झाल्या. पोलिसांनी याप्रकरणी सडा येथील अमर हरमलकर (वय २४) या कार चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

वरुणपुरी शांतीनगर या मार्गावरील साईनगर येथील रझिया या दुपारी पावणे एकच्या दरम्यान भारतीय तटरक्षक दलाच्या निवासी वसाहतीसमोरून घरी येण्यासाठी रस्ता पार करीत होत्या. यावेळी त्यांना वेगाने आलेल्या कारची धडक बसली. त्या कारसह काही अंतरावर फरफटत गेल्या. अपघातानंतर तेथे न थांबता चालक कारसह पळाला. कोणीतरी कारचा क्रमांक नोंद केला. या अपघातामुळे तेथील वस्तीतील रहिवाशी जमा झाले. कोणीतरी वास्को पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला.

कारसह पलायन केलेला कारचालक जयरामनगर येथे सापडला. त्याला ताब्यात घेण्यात आले. सर्व्हिसिंगसाठी दुसऱ्याची कार घेऊन अमर निघाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT