गोवा

म्हापसा नगराध्यक्षपदी प्रिया मिशाळ निश्चित; आज होणार अधिकृत घोषणा

अनुराधा कोरवी

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा : म्हापसा नगरपालिकेच्या महिलांसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी मंगळवारी, ३१ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहाच्या नगरसेविका प्रिया मिशाळ यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे नगराध्यक्ष म्हणून प्रिया मिशाळ यांचे नाव निश्चित झाल्यात जमा आहे.

माजी नगराध्यक्षा शुभांगी व्यंगणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रिया मिशाळ व डॉ. नूतन बिचोलकर यांच्या नावाची चर्चा होती. यात आमदार जोशुआ डिसोझा यांच्या निकटवर्ती असणाऱ्या प्रिया मिशाळ यांनी बाजी मारली आहे. डॉ. नूतन बिचोलकर यांना पुढील नगराध्यक्ष म्हणून आश्वासन मिळाल्याची चर्चा आहे. प्रिया मिशाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज पालिका मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डॉ. नूतन बिचोलकर, उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, नगरसेवक प्रकाश भिवशेट, नगरसेवक विराज फडके आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT