पणजी ः पुढारी वृत्तसेवा राज्यात गुन्हे वाढत असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे परप्रांतीयांमुळे गुन्हे वाढल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकत आहेत. त्यांनी नको ते आरोप न करता कायदे कडक करण्यावर भर द्यावा व गोव्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी केली आहे.
बुधवारी पणजी येथील आझाद मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील मागणी केली. अनेक पर्यटक गोव्यात फिरायला येतात. सोबत कुणा महिलेला आणतात आणि तिला इथे मारून पळून जातात, असा दावाही यावेळी त्यांनी केला. कायदे कडक नसल्याने गुन्हेगार मोकाट सुटतात. त्यामुळे कायदे कडक करण्याची नितांत गरज आहे.गोव्यात गुन्हे वाढत राहिले तर पर्यटक कमी होत जातील व गोव्यात बेरोजगारी वाढेल. त्यामुळे त्वरित पोलिस भरती करा, अशी मागणीही त्यांनी केली.