मडगाव : पुढारी वृत्तसेवा सां जुझे दी आरियल परिसरात बुधवारी (दि.7) सायंकाळी एका चालत्या कारने पेट घेतला. यावेळी कार मुगाळीच्या दिशेने जात होती. गाडीत दोघेजण होते, धूर येत असल्याचे लक्षात येताच ते कार थांबवून बाहेर पडले. त्यामुळे काही अघटित घडले नाही.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाऊण तासाचा अवधी लागला. ही कार यास्मिन बी शेख यांच्या नावावर नोंद आहे. या घटनेत कार जळून खाक झाली.