गोवा

मडगाव : भाजप मंडळाकडून सहा टीबी रुग्ण दत्तक

अनुराधा कोरवी

मडगाव : नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर आणि भाजप मंडळ पदाधिकारी, सचिव दीपक सावंत आणि प्रमोद प्रभू, सरपंच अविनाश सरदेसाई, उपसरपंच दामोदर चव्हाण, व्यापारी सुरेश फडते यांनी या रुग्णांना दत्तक घेतले आहे.

नावेली मतदारसंघातील या रुग्णांना बरे होण्यासाठी आवश्यक पोषण आणि उपचार सहाय्य दिले जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. क्षयरोगाबद्दलची जागरूकता आणखी वाढवू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्षयरोगमुक्त भारताच्या संकल्पनेवर एकजुटीने काम करू, असा संदेश भाजप मंडळाने दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT