मडगाव : पुढारी वृत्तसेवा दवर्ली येथे बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. यामध्ये चार दुचाकींसह कारचे नुकसान झाले. यात कुणालाच दुखापत झालेली नाही.
मायना कुडतरी पोलिसांनी हे प्रकरण मोटर वाहन कायदा अन्वये नोंद केले आहे. बुधवारी उशिरा हा अपघात घडला. ताबा गेल्याने बस चालकाने रस्त्याच्या शेजारी उभ्या केलेल्या चार दुचाकींना व एका चारचाकीला धडक दिली.