गोवा

परदेशी महिलेसह पाचजण गजाआड

backup backup

पणजी : पुढारी वृत्तसेवा ताळगावातील दीपक कुमार या युवकाचे रविवारी रात्री राहत्या फ्लॅटमधून अपहरण करण्यात आले. त्यानंतर मारहाण करून त्याच्याकडे 70 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी पणजी पोलिसांनी काही तासांतच पाच खंडणीबहाद्दरांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या पाचही जणांना प्रथमवर्ग न्यायालायाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या पाच जणांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. अटक केलेल्यांमध्ये अंतरिक्ष आशिष कुमार ( 33, रा. बिहार), अंबर आशिष कुमार (34, रा. बिहार), वरद मुन्नादादा (27, महाराष्ट्र), मोनिका प्रिया (31, रा. बंगळुरू) आणि झिओदा करिंजोनोव्हा (32, उझबेकिस्तान) यांचा समावेश आहे. या सर्वांनी दीपकला त्याच्या फ्लॅटमधून नेऊन करंझाळे येथील फ्लॅटमध्ये डांबून ठेवले आणि त्याच्याकडून 70 लाख रुपयांची मागणी केली.

पाचही संशयितांनी दीपक कुमार याला काही रक्कम दिली होती, ती त्यांनी मागण्यास सुरुवात केली. परंतु, दीपक कुमार ही रक्कम देण्यास टाळत होता. अखेर रविवारी रात्री वरील संशयितांनी त्याला ताळगावातील फ्लॅटमधून उचलला आणि करंझाळे येथील फ्लॅटमध्ये आणण्यात आले. करंझाळे येथे आणल्यानंतर या पाच जणांनी दीपक कुमारकडे दिलेली पान 2 वर रक्कम मागितली, पण त्याने देण्यास असमर्थता दर्शवली. अखेर पाचहीजणांनी दीपककुमारचा यथेच्छ चोप दिला. त्याचबरोबर त्याच्याकडे 70 लाख रुपये आत्ताच्या आत्ता देण्यासाठी तगादा लावला होता.

पाचही जणांचा मार पाहता आणि पैशाची वाढणारी मागणी पाहून दीपकुमार याने बहाणा करीत दिल्लीतील भावाला फोन करून पैसे देण्यास सांगतो, तो काहीतरी व्यवस्था करेल, असे सांगितले. त्यानुसार दीपककुमारने दिल्लीतील भावाला फोन लावला आणि आपले अपहरण झाल्याचे सांगितले. त्यानंतर दीपककुमारच्या दिल्लीतील भावाने पणजी पोलिसांना आपल्या भावाच्या अपहरणाची खबर दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने करंझाळे येथील दीपक कुमारला ठेवलेला फ्लॅट मोबाईलच्या लोकेशनवरून शोधून काढला आणि पाचही जणांच्या मुस्क्या आवळल्या.

ऑनलाईन गुंतवणुकीचा फटका

दीपक कुमार हा कॅसिनोमधील जुगारात पोकर खेळात माहीर होता. त्यामुळे एका कॅसिनोमध्ये त्याची ओळख अंतरीक्ष याच्याबरोबर झाली. या ओळखीतून ऑनलाईनद्वारे खेळणार्‍या या खेळात पाचहीजणांनी दीपककुमारच्या माध्यमातून काही रक्कम गुंतवली. या गुंतवणुकीतून मिळणार्‍या फायद्यामुळे त्यांची अपेक्षा वाढत गेली आणि त्यांनी आणखी रक्कम त्यात गुंतवली. ती रक्कम परत द्यावी म्हणून या गुंतवणूकदारांनी दीपकच्या मागे तगादा लावला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT