धारबांदोडा : पुढारी वृत्तसेवा; सावर्डे भाजपा मंडळातर्फे कुळे-शिगाव व मोले पंचायत क्षेत्रातील विविध क्षेत्रात योगदान दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला. मेठावडा-कुळे येथील राक्षस मळीकेश्वर मंदिराच्या सभागृहात या कार्यक्रम झाला.
यावेळी भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई, धारबांदोडा जिल्हा पंचसदस्य सुधा गावकर, कुळेचे सरपंच मच्छिंद्र देसाई, पंचसदस्य लक्सो डोईफोडे, सरपंच किशोर देसाई, मोलेचे पंच सदस्य बाबू शेळके, स्नेहलता नाईक, रामकृष्ण गावकर, दाबाळचे पंच सदस्य मोहन गावकर उपस्थित होते.
कुळेतील माजी शिक्षक यशवंत वेरेकर, सुरंगा मडकईकर, शेतकरी प्रकाश देसाई, लाईनमन रत्नाकर वेळीप, डॉ. अनुजा म्हार्दोळकर, डॉ. सायली मामलेकर, आयुर्वेदिक डॉ. साईशा गांजेकर. गुणवंत विद्यार्थी वैभवी आडाळकर, वेदांत वेळीप, क्रीडापटू रोयाना फर्नांडीस तर मोलेतील निवृत्त शिक्षिका वैशाली खांडेपारकर, साहित्यिक रामनाथ गावडे, कृष्णा झोरे, राम सांगोडकर, ऋतुजा शेठ वेरेकर, यशवंत गावकर, पुंडलिक गावकर, शेतकरी रमेश गावकर, भोमी लांबोर आणि बाबली पर्येकर यांचा सत्कार करण्यात आला.