गोवा

गोवा : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचे अनुदान होणार बंद

दिनेश चोरगे

पणजी; पुढारी वृत्तसेवा :   राज्य सरकारतर्फे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना बंद करण्यात आली आहे. याबाबत नवी आणि नूतनीकरण ऊर्जा खात्यातर्फे आदेश काढण्यात आला आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान मिळणे बंद होणार आहे.

आदेशात म्हणाले आहे की, 31 जुलैपासून ही योजना बंद करण्यात येणार आहे. यानुसार डिसेंबर 2021 ते 31 जुलै दरम्यान खरेदी करण्यात आलेल्या दो, तीन आणि चारचाकी वाहनांनाच अनुदान मिळणार आहे. मात्र, त्यानंतर हे अनुदान बंद केले
जाईल.राज्य आणि केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहने घेण्यास योजना आणल्या असल्या तरी राज्यात केवळ 3 हजार 527 इलेक्ट्रिक वाहने आहेत. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणार्‍या चार्जिंग स्टेशनचीही कमतरता आहे. सध्या राज्यात तीनच चार्जिंग स्टेशन आहेत. एकूण 3527 इलेक्ट्रिक वाहनांपैकी सर्वाधिक 2849 दुचाकी आहेत. त्याखालोखाल 579 चारचाकी, 50 बस, 31 तीन चाकी, तर 16 मालवाहू वाहने आहेत.

अनुदान घेणार्‍यांची संख्या घटली
2021-22 या वर्षात 163 जणांनी चारचाकीसाठी , 337 लोकांनी दुचाकीसाठी सरकारी अनुदान घेतले आहे. 22-23 वर्षात 63 लोकांनी चारचाकी वाहनांसाठी तर 252 लोकांनी दुचाकीसाठी अनुदान घेतले आहे, तर केवळ दोघांनी तीनचाकीसाठी अनुदान घेतले आहे.

SCROLL FOR NEXT