पणजी : राज्यात सध्या परतीचा पाऊस सुरू असून मंगळवारी, १५ रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने 'यलो अलर्ट' दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या परतीचा पाऊस सुरू आहे. हा पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह, कडाडणाऱ्या विजांच्या स्वरूपात असेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या २४ तासांत वाळपई, सांगे, साखळी येथील तुरळक पाऊस वगळता सर्वत्र हवामान कोरडे राहिले. गेल्या २४ तासात केवळ १.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत ९७.२ मिलिमीटर पावसाची शक्यता असताना १४४.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा ऑक्टोबर महिन्यातील ४८.६ टक्के जास्तीचा पाऊस आहे.