गोवा

गोवा : रक्षाबंधनाच्या उत्साहावर महागाईचे विरजण

दिनेश चोरगे

मडगाव;  रतिका नाईक :  येत्या 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने भावांसाठी बहिणींची राख्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी कच्च्या मालात वाढ झाल्याने राख्यांच्या भावात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिवाय आता अनेकजण आपापल्या प्रतिभेनुसार घरीच राखी बनवू विक्री करत लागल्याने ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. यामध्येही पावसाचा व्यत्यय निर्माण होत असल्याने दुकानमालक हिरमुसले आहेत.

राख्यांनाही महागाईचा फटका बसलेला असून उदा. इव्हील आय म्हणून तयार करण्यात आलेली राखी 80 रुपये प्रतिनग विक्री करण्यात येत आहे. दिवसेंदिवस नवनवीन डिजाईनच्या राख्या दिसत असल्याने पूर्वी दोरीवर मोठा गोल असलेल्या राख्या नाहीशा होताना दिसत आहेत. तरुणी बारीक नाजूक मोती खड्याचा डिजाईन असलेल्या राख्याना पसंती देत आहेत तर स्कूलात जाणार्‍या मुली आपल्या लहान भावांसाठी दोरेमॉन कार्टूनच्या राख्याना पसंती देत आहेत. महिलांकडून देवांच्या राख्यांना जास्त मागणी आहे. शिवाय बाकी राख्यांच्या बदल्यात देवांच्या राख्यांना जास्त मागणी असल्याचे व्यावसायिक सांगतात.

मुलामंध्ये कार्टून राख्यांचे विशेष आकर्षण आहे. रक्षाबंधनानिमित्त बाजारात विविध रंगांच्या व लहान मुलांसाठी विशेष कार्टूनच्या राख्या विक्रीस आल्या आहेत. यामध्ये सिल्व्हर, गोल्डन कोट असलेल्या राख्या महाग असल्यातरी दिसण्यास आकर्षक असल्याने बहिणी आपल्या भावांसाठी त्या खरेदी करताना दिसून येत आहेत.

बालके विविध कार्टूनच्या राख्यांना पसंती देत असल्याचे चित्र शहरातील दुकानांवर दिसून येत आहे. तसेच बाजारात गोंड्याच्या, राजस्थानी, रेशीम, स्पायडरमॅन, मिकीमाऊस, डोनाल्ड डक, स्टोन राखी, डिस्को लाईट, जू जू वंडरबॉय राख्यांचा समावेश आहे.
5 रुपयांपासून 1200 रुपये डजनपर्यंत राख्यांचे दर आहेत. कच्च्या मालात वाढ झाल्याने यंदा राख्यांच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. वाढ झाली म्हणून ग्राहकांनी पाठ केलेली नाही. दरम्यान कोरोना काळापासून घरोघरी राखी तयार करण्याचे प्रमाण वाढत आहे. याचा फटका बाजरालाही निश्चितच बसत आहे. अनेकांनी दुकानावर राखी घेण्यासाठी न जाता जे ऑनलाइन जाहिराती करून राखी विक्री करतात. त्यांच्याकडून राखी घेण्यास पसंती देत आहेत.

रक्षाबंधनाला अजून काही दिवस शिल्लक असल्याने अजून ग्राहकांचा ओघ नाही. सणाला दोन ते पाच दिवस बाकी असताना दुकानांवर रेलचेल वाढते. यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळणार असे वाटते.
– रोहन नाईक,
दुकान व्यावसायिक, सावर्डे

राख्यांमध्ये भाववाढ झाली आहे. महागाईच्या तुलनेत ही वाढ योग्यच आहे. गतवर्षीही कोरोनामुळे राखीचा व्यवसाय योग्यरीत्या होऊ शकला नाही. यंदातरी ग्राहकांची गर्दी आहे. कार्टून, देवांच्या राखीकडे लोकांचा कल आहे.
– संपदा तेली,
विक्रेता, मडगाव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT